Pro Kabaddi 2019 : अखेरच्या नाट्ययम चढाईत दिल्ली विजयी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 25 July 2019

प्रो कबड्डी 
हैदराबाद ः अखेरच्या चढाईत कमालीचे नाट्य घडलेल्या सामन्यात दिल्लीने तमिळ थलैवाचा 30-29 अशा अवघ्या एका गुणाने पराभव करून प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात गुरुवारी झालेल्या सामन्यात थरारक विजय मिळवला.

गच्चीबोवली स्टेडियममध्ये झालेला हा सामना अखेरच्या पाच मिनिटांत कमालीचा रंगतदार झाला. 11-18 पिछाडीवरून दिल्लीने हा सामना अखेरच्या चढाईत एका गुणाने जिंकला. भविष्यातील स्टार म्हणून पाहिले जात असलेल्या नवीन कुमारने दिल्लीला हा विजय मिळवून दिला. 

सामन्यातील अखेरची चढाई 29-29 अशी बरोबरी पण ही नवीन कुमारसाठी ही "डु ऑर डाय'होती तमिळकडे पाच बचावपटू होते त्यात एका कोपरा रक्षक मोहित चिल्लर आणि दुसरा मनजित चिल्लर होता. नवीनच्या खोलवर चढाईत मनजितचा पाय रेषेच्या बाहेर गेला तेवढ्याच मोहितने नवीनची पकड केली त्याला इतरांचीही साथ मिळाली. प्रयत्नकरूनही नवीन मध्यरेषा गाठू शकत नव्हता पण तेवढ्यात मनजित या चकमकीत आला आणि त्याने नवीनला पकडले. ही चुक त्याने केली आणि नवीनची चढाई गुण मिळवून देणारी ठरली. 

दिल्लीने रिव्ह्यू घेतला त्यात हे सगळी चमक स्पष्ट झाली. मनजितने जर नवीनला हात लावला नसता तर दोघांना एकेक गुण मिळाला असता आणि सामना टाय झाला असता. 

नवीन कुमारने 17 चढायांत आठ गुण मिळवले. मेराजने सहा तर कर्णधार ज्योगिंदर नरवालने चार गुणांचे योगदान दिले. राहुल चौधरी (7) आणि अजय ठाकूर (5) यांच्या खेळामुळे तमिळने सातत्याने आघाडी मिळवली होती पण अखेरच्या तीन मिनिटांपर्यंत एकेक खेळाडू गमावणाऱ्या तमिळवर लोण पकडला आणि दिल्लीने 29-29 बरोबरी साधली होती. 

​ ​

संबंधित बातम्या