क्रोएशियाचे इगोर स्टिमॅक होणार भारतीय फुटबॉलचे प्रशिक्षक

वृत्तसंस्था
Thursday, 9 May 2019

नवी दिल्ली : क्रोएशियाच्या विश्‍वकरंडक संघातील माजी खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक भारतीय फुटबॉल संघाचे मार्गदर्शक होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीने स्टिमॅक यांच्या नावाला पसंती दिली आहे. 

1998 च्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत क्रोएशियाने तिसरा क्रमांक मिळवला होता स्टिमॅक त्या संघाचे सदस्य होते. भारतीय फुटबॉल संघाच्या तांत्रिक समितीने आज झालेल्या बैठकीत इच्छुक मार्गदर्शकांची नावे शॉर्टलिस्ट करताना स्टिमॅक यांना प्राधान्य दिले आहे. 

चार इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर आम्ही भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीकडे आम्ही स्टिमॅक यांची शिफारस केली आहे, असे तांत्रिक समितीचे कार्याध्यक्ष श्‍याम थापा यांनी सांगितले. शनिवारी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येईल असे सुत्रांनी सांगितले. 

स्टिमॅक यांच्यासह दक्षिण कोरियाचे ली मिन सूंग, स्पेनचे अलब्रेटो रोचा आणि स्वीडनचे हाकेन एरिक्‍सन शर्यतीत होते, परंतु स्टिमॅक मुलाखतीसाठी स्वतः उपस्थित राहिले तर अन्य तिघांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाल्या.  
 
​ ​

संबंधित बातम्या