मैदानात क्रोएशिया अध्यक्षांचाही जल्लोष

वृत्तसंस्था
Monday, 9 July 2018

नाट्यपूर्ण लढतीत क्रोएशियाने यजमान रशियावर मात करून विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयाचा आनंद क्रोएशियात जल्लोषातच साजरा झाला. यात त्यांच्या राष्ट्राध्यक्षा कोलिंडा ग्रॅबार्किटारोविच यांचाही समावेश होता. फरक इतकाच की त्या थेट मैदानात होत्या. त्यांनी क्रोएशियाच्या परंपरेतील लाल-पांढऱ्या चौकटीचा टी-शर्ट घातला होता.

सोची : नाट्यपूर्ण लढतीत क्रोएशियाने यजमान रशियावर मात करून विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयाचा आनंद क्रोएशियात जल्लोषातच साजरा झाला. यात त्यांच्या राष्ट्राध्यक्षा कोलिंडा ग्रॅबार्किटारोविच यांचाही समावेश होता. फरक इतकाच की त्या थेट मैदानात होत्या. त्यांनी क्रोएशियाच्या परंपरेतील लाल-पांढऱ्या चौकटीचा टी-शर्ट घातला होता.

 

फिफा अध्यक्ष गिआनी इन्फॅंनटिनो आणि रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांच्या सह त्यांनी या सामन्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे रशियाच्या प्रत्येक गोल नंतर त्यांनी मेदवेदेव यांचे अभिनंदन केले. बरोबरी झाल्यावर दोन्ही प्रमुखांच्या चेहऱ्यावर दडपण होते. मात्र, विजयानंतर मेदवेदेव यांच्याकडून अभिनंदनाचा स्विकार केल्यावर कोलिंडा यांनी दोन्ही हात उंचावत उडी मारत विजयाचा आनंद साजरा केला.

हा व्हिडिओ क्षणात व्हायरल झाला त्याला तेवढ्याच जल्लोषात लाईक मिळत गेल्या. कोलिंडा यांनी पुढे खेळाडूंच्या ड्रेसिंगरूममध्ये जाऊन त्यांचे अभिनंदनही केले. त्यापूर्वी कोलिंडा सामना पाहण्यासाठी इतर लोकांसारखेच विमानाच्या इकोनॉमी क्लासने आल्या. त्यांनी व्हिआयपी स्टॅंडमध्ये बसण्यापेक्षा प्रेक्षकांसोबतच बसणे पसंत केले मात्र नंतर त्यांना व्हिआयपी स्टॅंडमध्ये बसवण्यात आले.


​ ​

संबंधित बातम्या