नव्या क्लबकडून रोनाल्डोचे अपयश कायम

वृत्तसंस्था
Sunday, 2 September 2018

युवेंट्‌सने पोर्तुगालचा स्टार फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा नऊ अब्ज रुपयांचा करार करत संघात समावेश करुन घेतला. मात्र त्याला अजूनही युवेंट्सकडून एकही गोल करण्यात यश आलेले नाही. पर्माविरुद्ध झालेल्या सामन्यात युवेंट्‌सने 2-1 असा विजय मिळवत गुणतक्त्यातील प्रथम क्रमांक कायम राखला आहे. 

मिलान : युवेंट्‌सने नऊ अब्ज रुपयांचा करार करत पोर्तुगालचा स्टार फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघात समावेश करुन घेतला. मात्र त्याला अजून युवेंट्सकडून एकही गोल करण्यात यश आलेले नाही. इटलीतील फुटबॉल स्पर्धेत पर्माविरुद्ध झालेल्या सामन्यात युवेंट्‌सने 2-1 असा विजय मिळवत गुणतक्त्यातील प्रथम क्रमांक कायम राखला आहे. 

पूर्वार्धात मारियो मांझूकिचने केलेला एक गोल आणि ब्लाइज मटूईडीने उत्तरार्धात केलेल्या गोलच्या जोरावर युवेंट्सने स्पर्धेतील आपला तिसरा विजय नोंदवला. मात्र रोनाल्डोला या तिन्ही सामन्यात एकही गोल करता आलेला नाही. रोनाल्डोला पूर्वार्ध संपण्यापूर्वी हेडरद्वारे गोल करण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र त्याला गोल करण्यात यश आले नाही. 

"रोनाल्डोला सीरिया स्पर्धेत वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, परंतु तो एक चांगला खेळ आहे", असे युवेंट्सचे प्रशिक्षक मासीमिलिआनो अल्लेग्री यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे, तो गोल करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे मात्र त्याला शांत राहून खेळ करण्याची गरज आहे.''


​ ​

संबंधित बातम्या