रोनाल्डोचा तुरुंगवास दीड अब्ज रुपयांत टळणार 

वृत्तसंस्था
Friday, 27 July 2018

माद्रिद : सुमारे दीड अब्ज रुपये देत ख्रिस्तियानो रोनाल्डोला करचुकवेगिरीच्या आरोपाबद्दलचा तुरुंगवास टाळता येईल, असा प्रस्ताव स्पेनमधील कर प्राधिकरणाने दिला आहे. रोनाल्डोला दोन वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात येईल, पण स्पॅनिश कायद्यानुसार हा टाळता येऊ शकेल. 

माद्रिद : सुमारे दीड अब्ज रुपये देत ख्रिस्तियानो रोनाल्डोला करचुकवेगिरीच्या आरोपाबद्दलचा तुरुंगवास टाळता येईल, असा प्रस्ताव स्पेनमधील कर प्राधिकरणाने दिला आहे. रोनाल्डोला दोन वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात येईल, पण स्पॅनिश कायद्यानुसार हा टाळता येऊ शकेल. 

रोनाल्डोचे सल्लागार आणि स्पेनमधील कर प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यात करार झाला आहे. त्यानुसार रोनाल्डोला 1 कोटी 90 लाख युरो (सुमारे 2 कोटी 20 लाख डॉलर किंवा सुमारे 1 अब्ज 51 कोटी 89 लाख 68 हजार रुपये) द्यावे लागतील. त्याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येईल. पहिल्यांदाच अहिंसक गुन्हा केल्यास स्पेनमध्ये दोन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेतून सूट मिळते. 

रोनाल्डोने या तडजोडीस नकार दिला असता तर त्याला 2 कोटी 80 लाख युरोचा दंड, तसेच साडेतीन वर्षांची कैद होण्याची शक्‍यता होती. लिओनेल मेस्सीने 2016 मध्ये करचुकवेगिरीच्या चौकशीतून टाळण्यासाठी 20 लाख युरोचा दंड भरला, तसेच 21 महिन्यांची कैद टाळण्यासाठी 2 लाख 52 युरोही भरले होते. 

रेयाल माद्रिद सोडून युव्हेंटसकडे गेलेला रोनाल्डो गतवर्षी जुलैत न्यायालयातील सुनावणीस उपस्थित राहिला होता. त्याने इमेज राईटस्‌द्वारे मिळालेले उत्पन्न स्पेन कर प्राधिकरणापासून लपविल्याचा आरोप होता. त्याचबरोबर त्याने कर चुकवण्यासाठी कमी कर असलेल्या देशातील कंपनीत गुंतवणूक केल्याचे दाखवले होते. त्याचबरोबर त्याने 2104 मध्ये आपले उत्पन्न 1 कोटी 15 लाख युरो असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात ते 2011-14 कालावधीसाठी 4 कोटी 30 लाख युरो हेते. त्याने 2015-20 दरम्यान इमेज हक्कासाठी मिळालेले 2 कोटी 84 लाख युरो रकमेची कमाईही लपवली.


​ ​

संबंधित बातम्या