रोनाल्डोने वेटरला दिली तब्बल 16 लाखांची टिप

वृत्तसंस्था
Friday, 20 July 2018

युव्हेंट्सचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा नुकताच संपूर्ण कुटुंब आणि मित्रांसह ग्रीसला फिरण्यासाठी गेला होता. तिथे रोनाल्डोने तो राहिलेल्या रिसॉर्टमधील कामगारांना तब्बल 16 लाखांची टिप दिली. 

पेलोपोनिज : युव्हेंट्सचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा नुकताच संपूर्ण कुटुंब आणि मित्रांसह ग्रीसला फिरण्यासाठी गेला होता. तिथे रोनाल्डोने तो राहिलेल्या रिसॉर्टमधील कामगारांना तब्बल 16 लाखांची टिप दिली. 

लवकरच होणाऱ्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत रोनाल्डोकडून त्याच्या नवीन क्लबला खूप अपेक्षा आहेत. त्यासाठी त्याला जोरदार तयारी करावी लागेल. त्यामुळेच त्याला जवळच्या माणसांना वेळ देणे शक्य होणार नाही म्हणूनच त्याने ग्रीसमध्ये सुट्टीचा आनंद घेतला.

जगातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या 33 वर्षीय रोनाल्डोने ग्रीसमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये कुटुंब आणि मित्रांसह वेळ घालवला. रोनाल्डो राहिलेल्या रिसॉर्टमध्ये त्याचा अतिशय उत्तम पाहुणचार करण्यात आला. आणि त्यामुळेच खुश होऊन त्याने त्या रिसॉर्टमधील सर्व कामगारांसाठी तब्बल 16 लाख रुपयांचा चेक टिप म्हणून दिला. 

 

Lovely moments

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

 

रोनाल्डोने नुकतेच इन्स्टाग्रामवर त्याच्या या सहलीचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तो त्याची आई, पत्नी, मुलगा आणि त्याचे मित्र यांच्यासोबत सुट्टीची मजा सुटताना दिसत आहे. रोनाल्डोने ग्रीसमध्ये असताना युव्हेंट्सचे अध्यक्ष आंद्रे अॅग्नेली यांचीही भेट घेतली. 

सूत्रांच्या माहितीनुसार रोनाल्डोला युव्हेंट्सच्या सरावासाठी होणाऱ्या अमेरिका दौऱ्याला न जाण्याची परवानगी मिळाली असून या काळात तो विश्रांती घेणार असल्याचे समजते. 


​ ​

संबंधित बातम्या