मान्सून संपल्यावरच क्रिकेट पुन्हा सुरु होईल! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

खेळाडूंची सुरक्षेचा विचार करता क्रिकेट खेळण्याचा निर्णय क्रिकेटपटूंवर सोडण्यात यावा असे मत व्यक्त केले आहे. 

जगभरातील व्यवहार कोरोना व्हायरसमुळे ठप्प झाले आहेत त्या दरम्यान भारतीय क्रिकेट नियमक मंडळ (बीसीसीआय)चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जोहरी यांनी देशात क्रिकेट खेळण्यास मान्सूनच्या नंतर सुरु होईल. तसेच आयपीएल स्पर्धेबद्दल ते आशादायी असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगीतले आहे. माध्यमांशी बोलताना जोहरी यांनी सध्या खेळाडूंची सुरक्षेचा विचार करता क्रिकेट खेळण्याचा निर्णय क्रिकेटपटूंवर सोडण्यात यावा असे मत व्यक्त केले आहे. 

प्रत्येक व्यक्तास स्वतःच्या सुरक्षेचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, प्रत्येक खेळाडूच्या इच्छेचा विचार केला गेला पाहिजे , त्यासोबतच स्पर्धांच्य आयोजनाबद्दल भारत सरकारच्या नियमांचे पालण करणे आवश्यक आहे. त्यामुळे पावसाळ्याच्यानंतरच क्रिकेट स्पर्धा सुरु करण्याचा विचार करण्यात येईल, असे जोहरी यांनी स्पष्ट केले. भारतात जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पावसाळा असतो, त्यामुळे जर ऑस्ट्रेलिया मध्ये आयोजीत करण्यात आलेला टी20 विश्वकप स्थगीत करण्यात आला तर आयपीएलचे आयोजन ऑक्टोबर-सप्टेंबर दरम्यान करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. तेव्हा जगातील कोरोना व्हायरसची स्थीती सुधारली आणि आणखी पर्याय खुले झाले तर स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते असे जोहरी यांनी सांगीतले. 

फक्त भारतीय खेळाडूंनी घेऊन आयपीएलचे आयोजन करण्याच्या विरोधात असल्याचे देखील जोहरी य़ांनी यावेळी सांगीतले, कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरातील विमानसेवा बंद असल्याने फक्त भारतातील क्रिकेटपटूंसोबत आय़पिएल खेळण्याची काही खेळाडूंनी शिफारस केली होती. कोरोना व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी खेळाडूंना नवे नियम स्विकारावे लागणार आहेत. आयपीएल मध्ये जगभरातील खेळाडू खेळतात त्यामुळेत हि स्पर्धा प्रसिध्द आहे. सर्धेचे महत्व टिकवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याचे जोहरी यांनी य़ावेळी सांगीतले. 


​ ​

संबंधित बातम्या