चहलच्या 'लाइफ पार्टनर'चा चक्क PPE किटमध्ये डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

सुशांत जाधव
Saturday, 15 August 2020

पंजाबी गाण्यावरील ठुमके अन् 'लहेंगा' गाण्यावरील तिचा डान्स चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. या गाण्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या यासंदर्भात जोरदार चर्चाही रंगत आहे.

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने नुकतेच युट्यूबर आणि नतृकार धनश्री वर्माला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडल्याचे जाहीर केले. धनश्री पेशाने डॉक्टर असून तिने डान्सर म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. युट्यूबच्या माध्यमातून ती आपल्या अंगातील कला सादर करत असते. युजवेंद्र आणि धनश्री आयुष्याची इनिंग सुरु करणार असल्याची बातमी समोर आल्यापासून धनश्री आणखी प्रकाशझोतात आलीय. तिच्या नेटकरी तिच्यासंदर्भात अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या धम्माल डान्सचे काही व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.  

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

पंजाबी गाण्यावरील ठुमके अन् 'लहेंगा' गाण्यावरील तिचा डान्स चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. या गाण्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या यासंदर्भात जोरदार चर्चाही रंगत आहे. ही चर्चा कायम असताना आता धनश्रीने आणखी एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती पंजाबी गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळते. विशेष म्हणजे तिने डान्स करताना पीपीई किट घातल्याचे पाहायला मिळते. 

कॅरेबियन लीगच्या मागील हंगामातील किंगची फटकेबाजी (व्हिडिओ)

युजवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वीत इन्स्टाग्राम पोस्टवरुन दोघांचा फोटो शेअर करुन आम्ही एकमेकांना पंसत केल्याची माहिती दिली होती. दोन्ही कुटुंबियांच्या साक्षीने आम्ही एकमेकांना पंसत केल्याचा उल्लेख करत आपली अरेंज मॅरेज असल्याचे सांगण्याचा प्रयत्न युजवेंद्रने त्याच्या पोस्टमधून केला होता. धनश्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ती पेशाने दातांवरील डॉक्टर आहे. तिला डान्स आणि कॉरियोग्राफीचाही छंद आहे. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर तिचे खूप फॉलोवर्स देखील आहे. हा आकडा आता आणखी वाढताना दिसतोय. 


​ ​

संबंधित बातम्या