200 जीम, फुटवेअर, एंटरटेनमेंट, हॉटेल... जाणून घ्या धोनीचा व्याप अन् कमाई

टीम ई-सकाळ
Tuesday, 7 July 2020

एमएस धोनीची कमाई 111 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 8 अब्ज 35 कोटीच्या घरात आहे.

मुंबई : इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापासून भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी क्रिकेटच्या मैदानात दिसलेला नाही. बीसीसीआयने चालू वर्षी केलेल्या करारातही त्याचे नाव नसल्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. धोनीनं अद्याप यावर काहीही भाष्य केलेलं नाही. आयपीएलच्या हंगामासाठी तो सज्जही झाला होता. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे आयपीएल स्पर्धेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर धोनीसाठी टी-20 वर्ल्ड कपचे दरवाजे उघडतील अशी चर्चाही रंगली. मात्र दोन्ही स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे. MS Dhoni 39 वर्षात पदार्पण करत असल्यामुळे त्याच्या कमबॅकसंदर्भात दिवसागणिक अडचणी वाढत जातील. लॉकडाऊनच्या काळात धोनी आपल्या फॉर्म हाऊसवर ऑर्गेनिक फार्मिंगची तयारी करत आहे. यासाठी त्याने जवळपास 8 लाख रुपयांचा ट्रॅक्टरही खरेदी केलाय. क्रिकेटच्या मैदानात अल्पावधीत यश मिळवणारा धोनी एक व्यावसायिक म्हणूनही सकारात्मक निर्णय घेत आहे.  त्याचे अनेक क्षेत्रातील व्यवसायात मोठी गुंतवणूक केली आहे.  

धोनी इन्स्टावर फक्त तिघांनाच करतो फॉलो

धोनीची कमाई 8 अब्ज पेक्षाही अधिक 
 

एमएस धोनीची कमाई 111 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 8 अब्ज 35 कोटीच्या घरात आहे. आयपीएलमधील फ्रेंचायजी चेन्‍नई सुपर किंग्‍ससोबतचा त्याचा करार 15 कोटी रुपयांचा आहे. माही वेगवेगळ्या जाहिरातीमध्ये दिसतो. क्रिकेटच्या मैदानातील अखेरच्या टप्प्यात असतानाही सर्वाधिक ब्राँड हे अजूनही त्याला प्रथम पसंती देतात. एका रिपोर्टनुसार धोनी जाहिरातीतून 195 कोटी इतकी कमाई करतो.  
 

जाहिरातदारांमध्येच निरुत्साह...काय होणार मग आयपीएलचे?

फुटबॉल, हॉकी अन् रेसिंग टीमचा मालक

इंडियन प्रीमियर लीग की फ्रेंचायजी चेन्‍नई सुपर किंग्‍सचा कर्णधार असलेला धोनीला फुटबॉलमध्ये विशेष रुची आहे. त्यामुळे इंडियन सुपर लीगमध्ये त्याने एक टीम खरेदी केली आहे. फुटबॉल टीम चेन्‍नई एफसीचा धोनी मालक आहे.  हॉकीमध्येही धोनीने आपली छाप सोडली आहे. हॉकी इंडिया लीगमधील  टीम रांची रेजचाही तो मालक आहे. बाइक्‍स चालवणे हा धोनीचा सर्वाधिक आवडता छंद आहे.  रेसिंग टीमसोबतही त्याचे नाव जोडले गेले आहे. धोनी दक्षिणात्य सुपरस्‍टार नागार्जुनसोबत सुपरस्‍पोर्ट वर्ल्‍ड चॅम्पियनशीपच्या रेसिंग टीम इंडियाचा सह मालक आहे. 

हॉटेलिंग बिझनेसमध्येही शिरकाव

 धोनीची पत्नी साक्षी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे. पत्नीचा हातखंडा असलेल्या क्षेत्रातही माहिनं गुंतवणूक केली आहे. झारखंडमध्ये माही रेजीडेंसी नावाने कॅप्टन कूलचं हॉटेलही आहे.  
 

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

फिटनेस 

धोनीचा फिटनेस कमालीचा आहे. वय हा फक्त आकडा असतो हे तो मैदानात खेळत असताना आपण पाहिले आहे. युवा खेळाडूंना फाइट देण्याची क्षमता आजही धोनीमध्ये आहे. लोकांना फिटनेससाठी योग्य जागा, कौशल्य असलेले ट्रेनर मिळावे या हेतून धोनीने देशभरात जीमही उघडल्या आहेत. स्पोर्ट्स फिट नावाने देशभरात जवळपास 200 जीम आहेत. याचा धोनी सहमालक आहे.  
 

फॅशन  

फॅशनच्या जगातही धोनीने मोठी गुंतवणूक केली आहे. त्याने लाइफ स्टाइल ब्रांड सेव्हन हा ब्रँड 2016 मध्ये लॉन्‍च केला. यातील फुटवेअर ब्रँडचा धोनी मालक आहे. 
 

मनोरंजन क्षेत्र

 मागील वर्षीच धोनीने  मनोरंजन क्षेत्रातही पदार्पण केले होते.  धोनी एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेड नावाने कंपनी सुरु केली. हा व्यवसाय विस्तारित करण्याच्या हेतून त्याने मुंबईतील अंधेरीमध्ये नवे कार्यालयही उघडले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या