BLOG : शतकी खेळीनंतर पाणी घेऊन येणाराच सचिनच्या आनंद अश्रूंचा धनी ठरला!

अमोल शिंदे
Tuesday, 7 July 2020

एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे दुसऱ्या सामन्यात वेस्ट झोनकडून त्यावेळी 199 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या 'सचिन रमेश तेंडुलकर' याने त्याच्याकडून पाणी मागितले. आणि पुढे जाऊन अनेक असेच धक्के खात या पाणी वाटणाऱ्या खेळाडूने सर्व अडचणींना पाणी पाजत फक्त भारतीय संघातच स्थान मिळवले नाही तर त्याच 'सचिन रमेश तेंडुलकर'चे 22 वर्षांचे 50 ओव्हर्सचा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न स्वत:चा नेतृत्वाखाली त्याच्यासोबत पूर्ण केले.

तो फक्त 19 वर्षाचा होता. त्यांच्या बिहार संघाचा रणजी सामना होता तगड्या बंगालशी. बिहारची स्थिती अगदी दयनीय होती. बिहार हा सामना एका डावाने हारणार हे जवळजवळ निश्चित होते. पण तेव्हा हा मैदानात उतरला. तळातील फलंदाजांना सोबत घेऊन याने दिवस संपेपर्यंत किल्ला लढवला. व आपल्या वयाच्या पुढे जाऊन नाबाद 114 धावांची एक समंजस, जबाबदार व परिपूर्ण खेळी करून तो सामना अनिर्णीत ठेवला. व बंगालला एक मोठा धक्का दिला. आपोआपच त्याने निवडसमितीचे लक्ष वेधले. 

BlOG : गोऱ्यांच्या देशात क्रिकेट मैदानावर उठणार अन्यायाविरोधात आवाज

परिणामी त्याला त्याच वर्षाच्या दुलीप ट्रॉफीसाठी ईस्ट झोनकडून निवडण्यात आले. त्याच वर्षी होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजला डोळ्यासमोर ठेवून त्याला ही संधी देण्यात आली होती. पण त्याची निवड झाल्याची बातमी क्रिकेट असोशिएशन ऑफ बिहारकडून त्याला चक्क कळवण्यातच आली नाही. बाकी सर्व निवड झालेल्या सदस्यांना ही बातमी कळाली व ते कोलकात्याला वेळेत पोहचले. व साऊथ झोनविरुद्ध आगरताळा येथे असणाऱ्या सामन्यासाठी विमानाने रवाना झाले.

दरम्यान, सामन्याला काही तास बाकी असताना त्याचा मित्र परमजीत सिंग म्हणजेच छोटू भैय्याच्या कानावर ही सर्व बातमी पडली. व त्याने याला येऊन सर्व घटना सांगितले. आता हातावर हात ठेवून मनस्ताप करत बसण्यापेक्षा त्यांनी काही पैसे जमा केले व हे प्रकरण ऐकल्यावर मनावर झालेल्या आघातासोबत भाड्याने टाटा सूमो कार घेऊन रांचीहून आगरताळ्याला रवाना झाले. सोबत अजून दोन मित्रही होते. ज्यापैकी एक याचा पुढे जाऊन जीजू झाला. लगबगीने हे निघाले असता अर्ध्या वाटेतच नेमकी कार बंद पडली. परिणामी पहिल्या सामन्याला हा वेळेत पोहचू शकला नाही. आणि कमी वयात स्वत:ला सिद्ध करायचे त्याचे स्वप्न भंगले. किंबहुना या व्यवस्थेचा तो नाहक बळी ठरला.

"If one Indian crab tries to climb out of the jar, nine others will pull it down."

पुढे जाऊन मागोवा काढल्यावर असे लक्षात आले की तो ज्या 'ईस्ट झोन'कडून खेळणार होता, त्यावर बंगालच्या रणजी संघाची पकड होती. त्याकाळात भारतीय संघात चांगल्या विकेटकीपरची वाणवा होती. हा चांगला तडाखेबाज फलंदाज व सोबत विकेटकीपरपरही होता. पण त्यावेळी बंगालचा दीपदास गुप्ताही जो विकेटकीपर फलंदाज आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला होता व पुढची भारत-ऑस्ट्रेलिया सीरिज बघता त्याला स्पर्धा देणारा कोणी संघात असणे बंगालच्या जिव्हारी लागणारे होते. म्हणून इतरांसोबत याची संघात निवड होऊनही फक्त यालाच जाणुनबुजून निवड झाल्याबद्दल कोणत्याच कमिटीकडून माहिती दिली गेली नाही. त्यामुळे ईस्ट झोनकडून पहिला साउथ झोनविरुद्ध व दुसरा पुणे येथील वेस्ट झोनविरुद्ध असलेल्या सामन्यात दिपदास गुप्ताच खेळला. हा दुसऱ्या सामन्यात संघाला जोडला गेल्यावरही त्याला फक्त १२वा खेळाडू म्हणून बघ्याचीच भूमिका घ्यावी लागली.

आयपीएल झालीच तर कोठे होणार ? स्वतः सौरव गांगुली काय म्हणतात...

या सर्वांत त्याच्यासोबत एकच गोष्ट चांगली घडली ती म्हणजे दुसऱ्या सामन्यात वेस्ट झोनकडून त्यावेळी 199 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या 'सचिन रमेश तेंडुलकर' याने त्याच्याकडून पाणी मागितले. आणि पुढे जाऊन अनेक असेच धक्के खात या पाणी वाटणाऱ्या खेळाडूने सर्व अडचणींना पाणी पाजत फक्त भारतीय संघातच स्थान मिळवले नाही तर त्याच 'सचिन रमेश तेंडुलकर'चे 22 वर्षांचे 50 ओव्हर्सचा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न स्वत:चा नेतृत्वाखाली त्याच्यासोबत पूर्ण केले.

जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत भारताचा डंका 

त्याने आपल्या नेतृत्वाखाली भारताला कसोटी व एकदिवसीय सामन्यात आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहचवले. टी-20 वर्ल्डकप, एकदिवसीय वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी असे तिन्ही आयसीसी चषक जिंकणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिला कप्तान ठरला. यासोबतच त्याने ऑस्ट्रेलिया संघाला मायदेशी व त्यांच्याच घरात जाऊन व्हाईटवॉश दिला. तो विस्डेन क्रिकेटर, जगात सर्वात जास्त कमाई करणारा क्रिकेटर ठरला.

असे कित्येक महेंद्रसिंग धोनी आजवर या व्यवस्थेने संपवले असतील. मात्र याने या सर्वांवर मात करून जग जिंकले, म्हणूनच याचे विशेष कौतुक वाटते.

"It is funny when luck is ascribed to some of Dhoni’s victories, because luck has not always been his best friend."

Happy Birthday, Captain Cool.
 


​ ​

संबंधित बातम्या