गंभीरने का लावली टिकली आणि घेतली ओढणी

वृत्तसंस्था
Friday, 14 September 2018

क्रिकेटर गौतम गंभीर आपल्या विचारांनी अनेकदा चर्चेत असतो. मात्र, यावेळी गौतम गंभीर आपल्या वेशभुषेमुळे चर्चेत आला आहे. गौतम गंभीरने कपाळावर टिकली आणि डोक्यावर ओढणी असल्याचे दिसत आहे. इतकेच नाहीतर त्याने चक्क साडीही परिधान केली आहे, याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवी दिल्ली : नुकतेच तृतीयपंथीयांकडून राखी बांधून घेणारा भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर याने चक्क टिकली लावून डोक्यावर ओढणी घेतल्याचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

क्रिकेटर गौतम गंभीर आपल्या विचारांनी अनेकदा चर्चेत असतो. मात्र, यावेळी गौतम गंभीर आपल्या वेशभुषेमुळे चर्चेत आला आहे. गौतम गंभीरने कपाळावर टिकली आणि डोक्यावर ओढणी असल्याचे दिसत आहे. इतकेच नाहीतर त्याने चक्क साडीही परिधान केली आहे, याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गौतम गंभीर या विशेष वेशभूषेत का आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, याचे उत्तर आहे, देशातील तृतीयपंथीयांसह समानतेसाठी आवाज उठविण्यासाठी त्याने ही वेशभूषा केली आहे. शेमारी सोसायटी आयोजित एका कार्यक्रमात गौतम गंभीरने त्याचे हे रुप 'हिजडा हब्बा'च्या सातव्या एडिशनच्या उद्धाटनासाठी केले आहे. जेव्हा गौतम गंभीर तेथे पोचला तेव्हा त्याने तृतीयपंथीयांसारखे वेशभूषा केली. गौतम गंभीरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गौतमचे याबाबत मत आहे, की तृतीयपंथीयांना समाजातील भेदभावाला सामोरे जावे लागते.

संबंधित बातम्या