महिला ट्वेन्टी-२० चॅलेंजर्स स्पर्धा रद्द होण्याची शक्यता

पीटीआय
Thursday, 29 April 2021

काही देशांनी भारतात प्रवासबंदी केली असल्यामुळे महिलांची आयपीएल म्हणून ओळखली जाणारी महिला ट्वेन्टी-२० चॅलेंजर्स यंदा होणे अशक्य आहे, असे मत बीसीसीआयच्या सूत्रांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली - काही देशांनी भारतात प्रवासबंदी केली असल्यामुळे महिलांची आयपीएल म्हणून ओळखली जाणारी महिला ट्वेन्टी-२० चॅलेंजर्स यंदा होणे अशक्य आहे, असे मत बीसीसीआयच्या सूत्रांनी व्यक्त केले. तीन संघांमध्ये होणारी ही स्पर्धा मुख्य आयपीएलच्या प्लेऑफमध्ये होत असते.

भारतात भीषण रूप घेत असलेल्या कोरोना महामारीमुळे मुळात मुख्य आयपीएल स्पर्धेचेच भवितव्य धोक्यात आले आहे. महिला ट्वेन्टी-२० चॅलेंजर्स स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज तसेच श्रीलंकेच्याही महिला खेळत असतात; परंतु आता या देशातून महिला खेळाडू तीन सामन्यांसाठी भारतात येण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सांगितले जात आहे.

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ही लीग होणे अपेक्षित आहे. त्यासाठी भारतीय महिला खेळाडूंचे सराव शिबिर बीसीसीआय आयोजित करण्याचा विचार करत आहे. देशातील खेळाडूंचे स्पर्धेअगोदर विलगीकरण करणे कठीण नाही; परंतु सध्याच्या परिस्थितीत परदेशी खेळाडू भारतात येणे अशक्य वाटत आहे. योग्य कालावधी मिळताच आम्ही ही लीग पुढे आयोजित करू, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

गतवर्षी अमिरातीत झालेल्या मुख्य स्पर्धेत महिलांचीही चॅलेंजर स्पर्धा झाली होती. त्याच कालावधीत ऑस्ट्रेलियात बिग बॅश झाल्याने ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सहभागी झाल्या नव्हत्या. आता तर ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि न्यूझीलंड या देशांनी भारतात प्रवासबंदी केली आहे. त्यामुळे तेथील खेळाडू भारतात येणे अशक्य आहे.


​ ​

संबंधित बातम्या