कूल धोनीवर भडकला होता संयमी द्रविड; सेहवागनं सांगितला भन्नाट किस्सा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 April 2021

नवख्या धोनीनं खराब फटका मारत आपली विकेट फेकली होती. त्यावेळी द्रविडला धोनीचा राग अला

When Dravid Was Angry On Dhoni : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याला जबरदस्त रागात पाहिल्याचा किस्सा माजी विस्फोटक खेळाडू विरेंद्र सेहवाग यानं सांगितला आहे. पाकिस्तानविरोधात झालेल्या एका सामन्यात नवख्या धोनीनं खराब फटका मारत आपली विकेट फेकली होती. त्यावेळी द्रविडला धोनीचा राग आला अन् त्याच्यावर भडकल्याचं सेहवागनं सांगितलं. 

क्रिकबजसोबत बोलताना सेहवागनं हा किस्सा सांगितलं. द्रविडच्या आलेल्या जाहीरातीवर चर्चा सुरु होती. यात सेहवागनं द्रविडच्या रागाचा किस्सा सांगितला.   सेहवाग म्हणाला, 'राहुल द्रविड किती रागाला जाऊ शकतो हे मी पाहिलेय.  आम्ही पाकिस्तानच्या दौऱ्याला गेलो होतो. त्यावेळी धोनी संघात नवखा होता. त्यावेळी मोक्याच्या क्षणी धोनीनं खराब फटका मारत आपली विकेट फेकली. धोनीच्या या फटक्यावर द्रविड प्रचंड नाराज झाला होता. तुझी खेळण्याची ही कोणतही पद्धत आहे? तुला सामना संपवण्याची कला यायला हवी. असं त्यावेळी द्रविडनं थेट धोनीला सांगितलं होतं.  

हेही वाचा ; द्रविड झाला 'इंदिरानगरचा गुंडा'; मुंबई-नागपूर पोलिसांचं ट्विट व्हायरल

सेहवाग पुढे म्हणाला की, द्रविड भडकल्यानंतर धोनीच्या फलंदाजीत मोठा बदल दिसून आला. धोनी अनावशक फटके टाळत होता अन् आपली विकेट टिकवून धावा काढत होता. मी त्याला मैदानात असं का खेळतोय विचारलं, त्यावर तो म्हणाला की, मला पुन्हा द्रविडचं बोलणं ऐकायचं नाही. 

हेही वाचा ; द्रविडने बॅटने फोडल्या गाडीच्या काचा; विराटने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल 

शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जाणारा द्रविड एका जाहीरातीमध्ये प्रचंड रागात आणि तोडफोड करताना दिसला. त्याच्या जाहीरातीनंतर इंदिरानगरचा गुंडा हा ट्रेंड सुरु झाला. 
 


​ ​

संबंधित बातम्या