द्रविडने बॅटने फोडल्या गाडीच्या काचा; विराटने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 9 April 2021

48 वर्षीय राहुल द्रविड सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आहे. एका जाहिरातीच्या माध्यमातून राहुल द्रविडचा राग व्यक्त झाल्याचे दिसते.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) संयमाचे आपल्याकडे दाखले दिले जातात. क्रिकेटच्या मैदानात असो किंवा मैदानाबाहेर तो रागात कधीच दिसलेला नाही. पण राहुल द्रविडच्या रागाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात राहुल द्रविड रागाच्या भरात बॅटने  एका वाहनाच्या काचा फोडताना पाहायला मिळते. विराट कोहलीने जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात राहुल द्रविड आपल्या कारमधून बाहेर येत स्वत:ला गुंड असल्याचे सांगताना दिसते. राहुल भाईचे हे रुप कधीच पाहिले नाही, या कॅप्शनसह कोहलीने हा व्हिडिओ शेअर केलाय. 

48 वर्षीय राहुल द्रविड सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आहे. एका जाहिरातीच्या माध्यमातून राहुल द्रविडचा राग व्यक्त झाल्याचे दिसते. यात तो खूप रागात दिसतो. आपल्या कारमधून तो दुसऱ्या कारचे साईड मिरर चक्क बॅटने फोडताना या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आले आहे. राहुल द्रविडच्या या अंदाजातील जाहिरातीवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते. 164 कसोटी, 344 वनडे आणि एक टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व करणारा राहुल द्रविड त्याच्या संयमी वृत्तीनेही प्रसिद्ध आहे. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर कोणत्याही गोष्टींवर तो कधी संतापल्याचे पाहायला मिळाले नाही. त्यामुळेच स्वभावाच्या विपरीत असलेल्या जाहिरातीमुळे द्रविड ट्रेंडमध्ये दिसतोय.  


​ ​

संबंधित बातम्या