"बाबर सचिनएवढा परफेक्ट; कोहलीनं त्याच्याकडून घ्यावे धडे"

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 12 April 2021

बाबरने विराटप्रमाणे फिटनेसवर भर द्यावा, असेही जावेद यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज आकिब जावे (Aaqib यांनी Javed) भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) एक सल्ला दिलाय. विराट कोहलीने बॅटिंग सुधारण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याच्याकडून टेक्निकल गोष्टी शिकायला पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. आकिब जावेद यांनी  पाकिस्तान संघाकडून 163 वनडे आणि 22 कसोटी सामने खेळले आहेत.  जावेद म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यात तुलना होत आहे. तांत्रिकदृष्ट्या कोहलीपेक्षा बाबर आझम परिपक्व दिसतो.

विराटने काही तांत्रिक गोष्टी बाबरकडून शिकण्यासारखे आहे. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज हे बाबर आझमला भारतीय कर्णधाराकडून बॅटिंगचे धडे घेण्याचा सल्ला देत असताना जावेद यांनी याउलट प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळते.  आकिब जावेद पुढे म्हणाले की, विराट कोहलीच्या भात्यात बाबरच्या तुलनेत अधिक शॉट्स आहेत. पण तो बाबरच्या तुलनेत काही ठिकाणी चुका करताना दिसते. जेव्हा चेंडूला स्विंग मिळतो त्यावेळी तो जाळ्यात अडकतो. जेम्स अड्रँसन विरुद्ध खेळताना तो ऑफ स्टंपवर ट्रॅपमध्ये अडकल्याचे पाहायला मिळाले. बाबर त्याच्याप्रमाणे जाळ्यात अडकत नाही.  बाबर हा  सचिन तेंदुलकरप्रमाणे तांत्रिकदृष्टट्या परिपक्व फलंदाज असल्याचा उल्लेखही जावेद यांनी केलाय.  बाबरने विराटप्रमाणे फिटनेसवर भर द्यावा, असेही जावेद यांनी म्हटले आहे. 

द्रविडने बॅटने फोडल्या गाडीच्या काचा; विराटने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

भारतीय कर्णधार विराट कोहली क्रिकेट जगतातील सर्वात फिट खेळाडू आहे. 2017 पासून भारतीय संघाने यो-यो टेस्ट सुरु केली. त्यावेळीपासून फिटनेसच्या बाबतीत भारतीय टीम अधिक सक्षम झालीय. यात विराट कोहली आघाडीवर आहे. बाबरने जर विराट कोहलीप्रमाणे फिटनेस ठेवला तर तो सर्वोत्कृष्ट खेळाडू बनू शकतो, असे मत जावेद यांनी व्यक्त केले आहे.  अंडर 19 वर्ल्ड कपपासूनच बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यात तुलना करण्यात येत आहे.  बाबरने  आतापर्यंत 31 कसोटी सामन्यात  2167 धावा, 80 वनडेत 3808 आणि 49 टी 20 सामन्यात 1744 धावा केल्या आहेत. दुसरीकडे  विराट कोहलीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कोहलीच्या खात्यात वनडेत 12169 तर 91 कसोटीत 7490 आणि आंतरराष्ट्रीय  टी 20 सामन्यात कोहलीच्या नावे  3159 धावा आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या