Vijay Hazare Trophy 2021 : मुंबईची ‘शॉ’नदार विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 February 2021

जयपुरिया विद्यालय मैदानावर प्रथम फलंदाजीस निमंत्रित केलेल्या दिल्लीची 3 बाद 10 अशी खराब सुरुवात झाली.

मुंबई : पृथ्वी शॉच्या शानदार शतकाच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दिल्लीविरुद्ध सात विकेट आणि 109 चेंडू राखून विजय मिळवला. गोलंदाजांनी रचलेल्या भक्कम पायावर पृथ्वीने विजयाचा कळस चढवला. 

Vijay Hazare Trophy 2021 : महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराजची शतकी चमक

जयपुरिया विद्यालय मैदानावर प्रथम फलंदाजीस निमंत्रित केलेल्या दिल्लीची 3 बाद 10 अशी खराब सुरुवात झाली. मुंबईने शिखर धवनला भोपळाही फोडू दिला नाही. धवल कुलकर्णीने काही वेळातच अवस्था 6 बाद 32 अशी बिकट केली. या पडझडीत टिकलेल्या हिम्मत सिंग आणि शिवांक वशिष्ठ यांनी सातव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. हिम्मतने दिल्लीस दोनशेच्या पार नेले.

Vijay Hazare Trophy 2021 : छोटा पॅक बडा धमाका; 18 वर्षाच्या पोरानं कुटल्या दीडशे धावा

पृथ्वीने सुरुवातीपासून हल्ला करीत दिल्लीच्या प्रतिकाराच्या आशा संपुष्टात आणल्या. पृथ्वीने श्रेयस अय्यरसह दुसऱ्या विकेटसाठी 82  धावांची भागीदारी करीत विजयाचा पाया रचला. सूर्यकुमार यादवने भारतीय ट्‌वेंटी 20 संघातील समावेशाचा आनंद अर्धशतकासह साजरा केला. त्याने पृथ्वीसह 93  धावा जोडत मुंबईचा विजय निश्‍चित केला. 
 


​ ​

संबंधित बातम्या