Vijay Hazare Trophy 2021: श्रीसंतने दाखवला 'पाच का दम' देवदत्तची तुफान फटकेबाजी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 22 February 2021

देवदत्त पद्दिकलने 98 चेंडूत 97 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने पद्दिकलला बोल्ड केलं. त्याचे शतक अवघ्या 3 धावांनी हुकले. 

Vijay Hazare Trophy 2021: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत 18 संघानी 9 सामने खेळले आहेत. स्फॉट फिक्सिंग प्रकरणामुळं तब्बल 7 वर्षांपासून मैदानाबाहेर असलेल्या श्रीसंतने केरळच्या संघाकडून धारदार गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. श्रीसंतने 5 विकेट घेण्याचा पराक्रम आपल्या नावे केला. त्याने 9. 4 षटकात 65 धावा खर्च करुन पाच विकेट घेतल्या. कर्नाटकच्या रविकुमार समर्थने बिहारविरुद्ध 144 चेंडूत 158 धावांची खेळी केली. देवदत्त पद्दिकलने 98 चेंडूत 97 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने पद्दिकलला बोल्ड केलं. त्याचे शतक अवघ्या 3 धावांनी हुकले. 

ग्रुप ए

गुजरात vs गोवा

गोवाच्या संघ प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 159 धावात बाद झाला. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या गुजरात संघाने माफक आव्हान आठ गडी राखून पार केले. या सामन्यात  प्रियांक पांचालने नाबाद 57 धावांची खेळी केली. 

हैदराबाद vs छत्तीसगड

हैदराबादने छत्तीसगड विरुद्धच्या सामन्यात 7 गडी राखून सामना खिशात घातला. छत्तीसगडने प्रथम फलंदाजी करताना  7  बाद 242 धावा केल्या होत्या. हे आव्हान हैदराबादने  3 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. तन्मय अग्रवालने 122 धावांची खेळी केली. 

बडोदा vs त्रिपुरा

बडोदा आणि त्रिपुरा यांच्यातील सामन्यात त्रिपुराच्या पदरी निराशा आली. बडोदाच्या संघाने 6 विकेट राखून विजय नोंदवला. त्रिपुराने 7 बाद 302 धावा केल्या होत्या. बडोदाच्या संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 303 धावा केल्या. क्रुणाल पांड्याने नाबाद 127 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

राशीद खानच्या हेलीकॉप्टर शॉटवर इंग्लिश महिला क्रिकेटर झाली फिदा (VIDEO)

ग्रुप बी

आंध्रप्रदेश  vs तमिलनाडू

या सामन्यात आंध्र प्रदेशच्या संघानं 7 गडी राखून विजय नोंदवला. तमिळनाडूच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 176 धावांत गारद झाला होता. माफक धावांचा पाठलाग कताना आंध्रच्या संघानं 3 गड्यांच्या मोबदल्या  181 धावा केल्या.  अश्विन हेब्बरने नाबाद 101 धावांची खेळी केली.  रिकी भुईने 52 धावा केल्या. 

विदर्भ vs मध्य प्रदेश

विदर्भाच्या संघाने मध्य प्रदेशला 4 विकेट्सने पराभूत केले. मध्य प्रदेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद  243 धावा केल्या होत्या. विदर्भ संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात  246 धावा करत सामना खिशात घातला. 

झारखंड vs पंजाब

ईशान किशनच्या नेतृत्वाखालील झारखंडने 2 धावांनी  विजय नोंदवला. प्रथम फलंदाज करताना झारखंडने 9 बाद 217 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 215 धावांत आटोपला.  

ग्रुप सी

रेल्वे vs ओडिशा

या सामन्यात रेल्वेच्या संघाने ओडिशाच्या संघाला 8 गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना ओडिशाच्या संघाने 230 धावा केल्या होत्या. रेल्वेनं  2 बाद 231 धावा करत सामना खिशात घातला. 

बिहार vs कर्नाटक

कर्नाटकने बिहारच्या संघाला 267 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने 3 बाद 354 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बिहारचा संघ 87 धावांत आटोपला. कर्नाटककडून समर्थने 158 आणि देवदत्त पदीक्कलने 97 धावांची खेळी केली.  प्रसिद्ध कृष्णाने 4 विकेट घेतल्या. 

उत्तर प्रदेश vs केरळ

केरळच्या संघाने उत्तर प्रदेशच्या संघाचा 3 विकेट्सने पराभव केला. पहिल्यांदा यूपीने 283 धावा केल्या होत्या. केरळकडून श्रीसंतने लक्षवेधी खेळी केली. त्याने 5 गडी बाद करण्याचा पराक्रम करुन दाखवला. त्यानंतर केरळने 7 बाद  284 धावा करत दुसरा सामना जिंकला. रॉबिन उथप्पाने 55 चेंडूत 81 धावा केल्या. 


​ ​

संबंधित बातम्या