एकोणीस वर्षांखालील मुलींची विश्‍वकरंडक क्रिकेट लांबणीवर? 

संजय घारपुरे
Thursday, 15 October 2020

विश्‍वकरंडक 19 वर्षांखालील मुलींची क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

नवी दिल्ली : विश्‍वकरंडक 19 वर्षांखालील मुलींची क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. आयसीसीने पहिली स्पर्धा 2021 च्या जानेवारीत घेण्याचे या वर्षाच्या सुरुवातीस ठरवले होते, पण स्पर्धेचे यजमानही अद्याप निश्‍चित केलेले नाहीत. 

''धोनीने उन्हात केस पांढरे केले नाहीत, त्यामुळेच तो वेगळा ठरतो....

विश्‍वकरंडक स्पर्धा लांबणीवर पडणार असल्याची खात्री असल्यामुळे भारतीय मंडळाने संघ निवडीचाही काही विचार केलेला नाही असल्याचे भारतीय मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. आयसीसीचे पदाधिकारी याबाबतचा निर्णय नोव्हेंबरमधील बैठकीत होईल, असे सांगत आहेत. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये घेण्याचे जवळपास ठरले आहे, पण अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. 

पंजाबचा किंग म्हणतो, आम्ही सर्व सामने जिंकून कमबॅक करू, पाहा व्हिडिओ

या स्पर्धेकडे आयसीसीने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. 19 वर्षांखालील मुलींच्या संघांची निवड सोपी नसते. भारतीय मंडळाने ही स्पर्धा लक्षात घेऊनच संघटनांना सोळा वर्षांखालील मुलींची स्पर्धा घेण्याची सूचना केली आहे.


​ ​

संबंधित बातम्या