AUSvsIND : सिडनीत टीम इंडिया कांगारुंविरोधात यॉर्कर शस्त्राचा वापर करणार?

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 5 January 2021

कोरोनाच्या संकटामुळे संयुक्त अरब अमिरातीत पार पडलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या तेराव्या हंगामात टी नटराजनने दमदार कामगिरी करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

कोरोनाच्या संकटामुळे संयुक्त अरब अमिरातीत पार पडलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या तेराव्या हंगामात टी नटराजनने दमदार कामगिरी करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नेट गोलंदाज म्हणून टी नटराजनची निवड केली होती. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलिया सोबतच्या तिसऱ्या एकदिवसीय आणि पुढे टी-ट्वेन्टी सामन्यात देखील टी नटराजनने पदार्पण करत धमाकेदार खेळी केली होती. 

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

टी नटराजनने ऑस्ट्रेलिया सोबतच्या टी-ट्वेन्टी सामन्यांमध्ये देखील उत्तम खेळी केल्यानंतर आता तो ऑस्ट्रेलिया सोबतच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. सिडनीच्या एमसीजी स्टेडियमवर होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टी नटराजनची प्लेयिंग इलेव्हन मध्ये याअगोदरच निवड झाली आहे. त्यामुळे या सामन्यात तो कसोटी मध्ये देखील पदार्पण करण्याची शक्यता आहे. टी नटराजनने आज सोशल मीडियावरील ट्विटरवर टीम इंडियाचा कसोटी संघातील जर्सी घालत फोटो शेअर केला आहे. व या फोटोसह टी नटराजनने भारतीय संघाचा व्हाईट जर्सी घातल्याचा अभिमान असल्याचे लिहित, नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी तयार असलयाचे कॅप्शन दिले आहे.     

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात उमेश यादवला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागले होते. सामन्यानंतर घेण्यात आलेल्या स्कॅनवरून उमेश यादव मालिकेच्या उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये खेळणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता त्याच्या जागी टी नटराजन तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. व त्यामुळे एकाच दौऱ्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात म्हणजे एकदिवसीय, टी-ट्वेन्टी आणि कसोटी संघात टी नटराजन पदार्पण करताना दिसू शकेल. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला डे नाईट सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर आता तिसरा सामना येत्या गुरुवारपासून खेळवण्यात येणार आहे. आणि शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे 15 जानेवारी ते 19 जानेवारीला खेळवण्यात येईल.


​ ​

संबंधित बातम्या