Syed Mushtaq Ali Trophy : रैना बरसे ना! उत्तर प्रदेशची पराभवाची हॅटट्रिक

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 14 January 2021

उत्तर प्रदेशनं दिलेले लक्ष्य जम्मू काश्मीरच्या संघाने सहज परतावून लावले. त्यांनी 30 चेंडू आणि 8 विकेट राखून दिमाखदार विजय नोंदवला.

Syed Mushtaq Ali Trophy : फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या संघावर सलग तिसऱ्या पराभवाची नामुष्की ओढावली.  जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशच्या संघाने निर्धारित 20 षटकात 124 धावा केल्या. पंजाब विरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी करणाऱ्या रैनाला या सामन्यात खातेही उघडता आले नाही. उत्तर प्रदेशकडून युवा कर्णधार प्रियम गर्गने सर्वाधिक 35 धावा केल्या. जम्मू काश्मीरच्या मुज्तबा युसूफने 14 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्या.

उत्तर प्रदेशनं दिलेले लक्ष्य जम्मू काश्मीरच्या संघाने सहज परतावून लावले. त्यांनी 30 चेंडू आणि 8 विकेट राखून दिमाखदार विजय नोंदवला. आयपीएलमध्ये आपल्या खेळीनं लक्ष्य वेधून घेणाऱ्या अब्दुल समदने नाबाद 54 धावांची खेळी केली. समदला शुभम खजूरियाने नाबाद 34 धावा करत उत्तम साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 89 धावा केल्या.

Syed Mushtaq Ali 2020 : अझरुद्दीनचा शतकी धमाका; 197 धावा करुनही मुंबई हरली (Video)

यापू्र्वी उत्तर प्रदेशला पंजाब विरुद्ध 11 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. रेल्वेने देखील त्यांना 8 विकेट्सने पराभूत केले होते. या सामन्यातही रैनाच्या भात्यातून धावा निघाल्या नव्हत्या. या सामन्यात त्याला कर्ण शर्माने 6 धावांवर तंबूत धाडले होते. आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर या स्पर्धेत दमदार कामगिरीच्या जोरावर आयपीएलच्या पुढील हंगामात लक्षवेधी ठरण्याच्या इराद्याने रैना मैदानात उतरला आहे. मात्र त्याच्या पदरी येणारी निराशा आणि संघाचे अपयश यामुळे त्याच्या अडचणी वाढू शकतात. 


​ ​

संबंधित बातम्या