चेंडू निर्जंतुकीकरण करणे पडले महागात 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 September 2020

नियमांचा भंग केल्याप्रकरणी मिच क्‍लायडॉन सरेविरुद्ध पुढील सामन्यात खेळता येणार नाही. याआधी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आयसीसीने काही नवीन नियम आखून दिले आहेत.

लंडन : इंग्लडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धेत ससेक्‍स संघाकडून प्रतिनिधित्व करत असलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिच क्‍लायडॉनने चेंडूला हाताचे निर्जंतुकीकरण करणारे औषध लावले. त्यामुळे त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. बॉब विलीस ट्रॉफीत ससेक्‍स विरुद्ध मिडलसेक्‍स सामन्यादरम्यान हा प्रकार घडला आहे.

आयपीएलचे संपर्ण वेळापत्रक एका क्लिकवर 

नियमांचा भंग केल्याप्रकरणी मिच क्‍लायडॉन सरेविरुद्ध पुढील सामन्यात खेळता येणार नाही. याआधी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आयसीसीने काही नवीन नियम आखून दिले आहेत. तसेच गोलंदाजांना चेंडूला चमक आणण्यासाठी लाळ लावण्यास  मनाई केली आहे. ३७ वर्षीय क्‍लॉयडॉन हा ऑस्ट्रेलियन प्रथम श्रेणी क्रिकेटमधला दिग्गज खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने ११२ प्रथमश्रेणी; तर ११० अ-श्रेणीचे सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३१० विकेट्‌स घेतल्या आहेत.


​ ​

संबंधित बातम्या