श्रीलंकेचे प्रशिक्षक पीपीई किट घालून घेतात खेळाडूंचा सराव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 July 2021

फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर आणि कामगिरी विश्लेषक निरोशन कोरोनाबाधित झाल्याचा धसका श्रीलंका क्रिकेट मंडळाने घेतला आहे. एकतर भारताविरुद्धची मालिका पुढे ढकलावी लागली, आता तर सहाय्यक प्रशिक्षकांना पीपीई किट घालून त्यांच्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे.

कोलंबो - फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर आणि कामगिरी विश्लेषक निरोशन कोरोनाबाधित झाल्याचा धसका श्रीलंका क्रिकेट मंडळाने घेतला आहे. एकतर भारताविरुद्धची मालिका पुढे ढकलावी लागली, आता तर सहाय्यक प्रशिक्षकांना पीपीई किट घालून त्यांच्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे.

कोरोनाच्या काळात क्रिकेट सुरू असताना संपूर्ण संघ जैविकरणात राहिलेला आहे. सरावासाठी किंवा सामन्यासाठी मैदानात येईपर्यंत खेळाडू मास्क वापरत आहेत, परंतु पीपीई किट घालून सराव असा प्रसंग पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये घडलेला आहे. 

अँडी फ्लॉवर आणि निरोशन यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाल्यानंतर श्रीलंका मंडळ सावध झाले आणि इंग्लंडहून मालिका खेळून आलेल्या संघातील सर्व खेळाडूंच्या चाचण्या सुरू केल्या. दसून शनाका, कुशल परेरा, दुशमंता चमीरा, धनंजया डिसिल्वा या सीनियर खेळाडूंसह इतर खेळाडू निगेटिव्ह आले आणि त्यांनी प्रेमदासा स्टेडियमवर सराव सुरू केला. यावेळी सहाय्यक प्रशिक्षक त्यांना पीपीई किट घालून सरावात मदत करत होते.

खेळाडूंना तातडीने विलगीकरणात दाखल केल्यानंतर श्रीलंका मंडळ एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकांसाठी दोन वेगवेगळे संघ तयार करण्याचा विचार करत होते; परंतु एकाही खेळाडूला कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट होताच त्यांनी एकाच संघावर भर दिला, परंतु सुरक्षेच्या उपाययोजना वाढविल्या.


​ ​

संबंधित बातम्या