SLvsENG : डॉम-ब्रॉडच्या माऱ्यासमोर लंका 'बेहाल'; 135 धावांत संघ गळपटला

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 14 January 2021

इंग्लंडकडून डॉम बेसनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. ब्रॉडला 3 विकेट मिळाल्या. 

श्रीलंका दौऱ्यावर असेलल्या इंग्लंड संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लंकेची बिकट अवस्था केली आहे. पहिल्या दिवशी श्रीलंकेचा संघ अवघ्या 135 डावात कोलमडला. थिरुमने आणि कुशेल परेरा यांनी श्रीलंकेच्या डावाला सुरुवात केली. संघाच्या धावफलकावर अवघ्या 16 धावा असताना ब्रोडनं संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर ब्राडनं मेंडिसला खातेही उघडू दिले नाही. 

कुशल परेराने डॉम बेसने 20 धावांवर माघारी धाडले. मथ्यूज 27 धावा करुन परतला. कर्णधार चंडिमलने सर्वाधिक 28 धावा केल्या. डिक्वेला (12), शनाका (23), हसरंगा(19) धावा करुन बाद झाले. दिलरुवन परेरा, इंम्ब्लडेनिया शून्यावर बाद झाले फर्नांडोला खातेही उघडता आले नाही. तो शून्यावर नाबाद राहिला. इंग्लंडकडून डॉम बेसनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. ब्रॉडला 3 विकेट मिळाल्या. 

AusvsInd : दुखापतीचं ग्रहण भारताच्या विजयाआड येणार नाही; अख्तरची 'बोलंदाजी'

पहिला डाव स्वस्तात आटोपल्यानंतर श्रीलंकेनेही इंग्लंडला सुरुवातीला धक्के दिले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या झॅक क्राउले अवघ्या 9 धावांवर बाद झाला. डॉमिनिक सिब्ले 4 धावांवर माघारी फिरला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या