सात वर्षानंतर श्रीसंत करतोय कमबॅक; मैदानावर परतण्यासाठी झालाय सज्ज

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतवर 2013 मध्ये इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) हंगामात झालेल्या फिक्सिंगसाठी आजीवन बंदी घालण्यात आली होती.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतवर 2013 मध्ये इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) हंगामात झालेल्या फिक्सिंगसाठी आजीवन बंदी घालण्यात आली होती. परंतु नंतर ती कमी करून सात वर्ष करण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी सप्टेंबरमध्ये त्याच्या या बंदीची मुदत संपली आहे. आणि तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास सज्ज झाला आहे.

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज

श्रीसंत सात वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजी करण्यास सज्ज झालेला आहे. व तो केरळ टी -20 लीगमधून मैदानात उतरणार आहे. भारतातील स्थानिक क्रिकेटचे आयोजन सुरु होण्यापूर्वी  केरळ मधील टी -20 स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या लीग मधून पुनरागमन करत श्रीसंत क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष के. वर्गी यांनी यंदाच्या टी-20 लीगमध्ये श्रीसंत खेळणार असल्याचे म्हटले आहे.

मॅक्सवेल 10 कोटीची चिअरलीडर; सेहवागच्या बोलंदाजीवर ऑसी खेळाडूची संयमी फटकेबाजी 

याव्यतिरिक्त, डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला या टी-20 लीग स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार असल्याची माहिती वर्गी यांनी दिली आहे. परंतु त्यासाठी प्रथम केरळच्या राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात बंदीची मुदत संपल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी उत्सुक असल्याचे श्रीसंत म्हटले होते. व तसेच पुन्हा टीम इंडियाचा भाग व्हायचे असल्याचे त्याने म्हटले होते.        


​ ​

संबंधित बातम्या