RSAvsPAK T20I : रिझवान एकटा भारी पडला; पाकिस्तानची विजयी सलामी

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 10 April 2021

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान याने डावाला सुरुवात केली.

मोहम्मद रिझवानच्या नाबाद 74 धावांच्या जोरावर पाकिस्तान संघाने चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजय सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना  यजमान दक्षिण आफ्रिका संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 188 धावा केल्या होत्या. मारकरम 51 (32) आणि क्लासेन 50 (28) अर्धशकाशिवाय पीट बिल जॉन 34 (24), मलान 24(16) धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाझने आणि हसन अली यांनी प्रत्येकी दोन दोन तर  हॅरिस राऊफ आणि शाहिद आफ्रिदी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळवली. 

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान याने डावाला सुरुवात केली.  धावफलकावर 41 धावा असताना बाबर आझम 14 धावा करुन परतला. हँड्रिक्सने त्याला बाद केले. फखर झमान 27,   मोहम्मद हाफिज 13, हैदर अली 14 आणि फाहिम अश्रफ 30 धावा करुन परतल्यानंर हसन अलीच्या साथीने सलामीवीर रिझवानने संघाला विजय मिळवून दिला. 

CSKvsDC : गब्बरचा जबरदस्त कॅच; ऋतूराजला स्वस्तात धाडलं तंबूत (VIDEO)

टी-20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेला 2-1 असे पराभूत केले. तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले. याचा फायदा उठवत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरात पराभूत केले. टी-20 मालिकेची सुरुवातही त्यांनी तशीच केली आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना घेऊन त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून ही मालिका पाकिस्तान जिंकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या