द. आफ्रिका क्रिकेट मार्गदर्शकांना कोरोनाची बाधा कळलीच नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

एखाद-दोन दिवस अस्वस्थ वाटत होते. खेळाडूंसह क्षेत्ररक्षणाचा सराव करताना वेदना होत होत्या, असे त्यांनी सांगितले. जैवसुरक्षित वातावरणात रहाणे फारसे आव्हान नाही. यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव अनेकदा आम्हाला हॉटेलमध्येच मुक्काम करणे भाग पडले होते, असे त्यांनी सांगितले. 

केपटाऊन : आपल्यालाही कोरोनाची बाधा झाली होती, पण ती कधी झाली हे कळलेच नव्हते, असे दक्षिण आफ्रिकेचे मुख्य मार्गदर्शक मार्क बाऊचर यांनी सांगितले. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका २७ नोव्हेंबरपासून सुरू होईल, त्यापूर्वी बाऊचर यांनी ही माहिती दिली. मला कोरोना झाला आहे हे कळलेच नाही.

एखाद-दोन दिवस अस्वस्थ वाटत होते. खेळाडूंसह क्षेत्ररक्षणाचा सराव करताना वेदना होत होत्या, असे त्यांनी सांगितले. जैवसुरक्षित वातावरणात रहाणे फारसे आव्हान नाही. यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव अनेकदा आम्हाला हॉटेलमध्येच मुक्काम करणे भाग पडले होते, असे त्यांनी सांगितले. 

पुन्हा मैदानात आल्याचा आनंद : शास्त्री

आफ्रिका संघातील तिघे विलगीकरणात
 दक्षिण आफ्रिका संघातील एका क्रिकेटपटूस कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यासह त्यांच्या संपर्कात असलेल्या दोघांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या तीनही खेळाडूंची नावे सांगण्यास क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने नकार दिला आहे. सध्या आफ्रिका संघ जैवसुरक्षित वातावरणात आहे. त्यात प्रवेश करण्यापूर्वी संघातील सर्व खेळाडू, तसेच सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी झाली होती. 

​ ​

संबंधित बातम्या