आगामी इंग्लंड दौरा मायदेशातच घेण्याचा प्रयत्न करू -  सौरव गांगुली 

टीम ई-सकाळ
Monday, 28 September 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पुढच्या वर्षी इंग्लंड आणि भारत यांच्यातील मालिका मायदेशात घेण्याच्या आयोजनाबाबत पुनरुच्चार केला आहे.

चीनच्या वुहान शहारत सर्वप्रथम आढळलेल्या कोरोना विषाणूने नवीन वर्षाच्या सुरवातीलाच संपूर्ण जगभर पाय पसरायला सुरवात केले. आणि त्यामुळे सगळ्या जगालाच आपापल्या घरात अडकून राहण्याची वेळ आली. याचा परिणाम क्रीडा जगतावर देखील तितकाच झाला. कधी नव्हे तेंव्हा क्रीडा क्षेत्र देखील थांबले. मात्र त्यानंतर कोरोनाची खबरदारी घेत खेळाडू पुन्हा मैदानावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळेच  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पुढच्या वर्षी इंग्लंड आणि भारत यांच्यातील मालिका मायदेशात घेण्याच्या आयोजनाबाबत पुनरुच्चार केला आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) चा तेरावा हंगाम संयुक्त अरब अमिरातीती घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. तसेच सध्याच्या स्थितीला देखील देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली नसल्यामुळे पुढील वर्षी होणारी इंग्लंड मालिका सुद्धा अमिरातीत खेळवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता बीसीसीआयचे लक्ष हे दौरे भारतात घडवून आणण्यावर आहे. त्यामुळेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी इंग्लंड सोबतची मालिका भारतातच खेळवण्यासंदर्भात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. इंग्लंडचा भारतीय दौरा भारतीय मैदानांवरच आयोजित करण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी म्हटले आहे. 

संजू सॅमसनच्या तुफानी खेळी मागे आहे, प्रचंड मेहनत !

सौरव गांगुली यांनी इंग्लंडच्या भारतीय दौऱ्याबद्दल अधिक बोलताना, '' आम्हाला आमचा घरगुती हंगाम हवा आहे. त्यामुळे देशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तर मागील सहा महिने परिस्थिती अधिक बिकट होती. यामुळे सर्वकाही व्यवस्थित ठेवणे कठिण होते. तर क्रिकेट व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. परंतु कोविडच्या परिस्थितीवरही बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे,'' असे ते म्हणाले. 

दरम्यान, इंग्लंडचा संघ पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान पाच कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी -20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौर्‍यावर येणार आहे. तर भारतात आत्तापर्यंत 60 लाख  74 हजार 702 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. आणि 95 हजार 542 नागरिकांचा मृत्यू कोरोनाच्या विषाणूमुळे झालेला आहे. यासह भारत कोरोना संक्रमित देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला असून, भारताच्या पुढे अमेरिका पहिल्या नंबरवर आहे.    

     


​ ​

संबंधित बातम्या