आयपीएलसाठी श्रेयस अय्यर तयार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 July 2021

खांद्याची दुखापत आणि त्यावर झालेली शस्त्रक्रिया यामुळे क्रिकेटपासून दूर असलेला श्रेयस अय्यर पूर्ण तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे. अमिरातीत सप्टेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्यास आपण तयार असल्याचे अय्यरने सांगितले.

नवी दिल्ली - खांद्याची दुखापत आणि त्यावर झालेली शस्त्रक्रिया यामुळे क्रिकेटपासून दूर असलेला श्रेयस अय्यर पूर्ण तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे. अमिरातीत सप्टेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्यास आपण तयार असल्याचे अय्यरने सांगितले. 

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना अय्यरचा खांदा दुखावला होता. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आयपीएलला तो मुकला होता. ही आयपीएल कोरोनामुळे अर्धवट राहिली. आता उरलेल्या ३१ सामन्यांची स्पर्धा अमिरातीत होणार आहे. तोपर्यंत आपण पूर्ण तंदुरुस्त असून खेळण्यास सज्ज असल्याचे अय्यरने सांगितले. 

पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत अय्यर नसल्यामुळे रिषभ पंतकडे दिल्ली संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. उरलेल्या आयपीएलमध्ये नेतृत्व करणार का, या प्रश्नावर अय्यर म्हणाला, कर्णधारपदाबाबतचा निर्णय संघ मालकांच्या हाती आहे; पण माझ्यासाठी संघ महत्त्वाचा आहे. सध्या आम्ही अव्वल स्थानावर आहोत. माझ्यासाठी हे महत्त्वाचे आहे. दिल्लीसाठी आयपीएल जिंकणे हेच ध्येय आहे.


​ ​

संबंधित बातम्या