मांजरेकर - अश्विनचा ट्विटरवरून लक्ष्यवेध

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 June 2021

रवीचंद्रन अश्विनची सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना करणे चुकीचे आहे, अशी टिप्पणी संजय मांजरेकर यांनी केल्यानंतर आता दोघांतील ट्विटर चकमक सुरू झाली आहे; मात्र अश्विनने रवींद्र जडेजाइतकी aआक्रमकता दाखवलेली नाही.

मुंबई - रवीचंद्रन अश्विनची सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना करणे चुकीचे आहे, अशी टिप्पणी संजय मांजरेकर यांनी केल्यानंतर आता दोघांतील ट्विटर चकमक सुरू झाली आहे; मात्र अश्विनने रवींद्र जडेजाइतकी aआक्रमकता दाखवलेली नाही. रवींद्र जडेजा हा बिटस् अँड पिसेस क्रिकेटर आहे, अशी टिप्पणी मांजरेकर यांनी २०१९ मधील विश्वकरंडक स्पर्धेच्या वेळी केली होती. त्या वेळी स्पर्धेत अर्धशतक केल्यानंतर समालोचन कक्षाच्या दिशेने बॅट जोरदार उंचावली होती.

अश्विनची प्रतिक्रिया तुलनेत शांत आहे. अश्विनने अपराजिता या चित्रपटातील दृश्याचे छायाचित्र ट्विट करताना त्यासोबत तमीळमध्ये टिप्पणी केली. त्याचा अर्थ या प्रकारची टिप्पणी नको, त्यामुळे वेदना होतात असे म्हटले. मांजरेकर यांनी त्यास लगेच उत्तर दिले. अश्विनच्या टिप्पणीत चारी हा शब्द होता. क्रिकेटबाबत टिप्पणी करताना सर्रास काही शब्दांचा वापर होतो, याच्या मला वेदना होता, अशा अर्थाचे ट्विट केले.


​ ​

संबंधित बातम्या