मास्टर ब्लास्टर करणार प्लाझ्मा दान

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 April 2021

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनाच्या संसर्गातून आता पूर्ण बरा झाला आहे आणि जेव्हा आपण पात्र ठरू त्या वेळी इतरांसाठी प्लाझ्मा दान करू असा निश्चय त्याने वाढदिवशी जाहीर केला.

मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनाच्या संसर्गातून आता पूर्ण बरा झाला आहे आणि जेव्हा आपण पात्र ठरू त्या वेळी इतरांसाठी प्लाझ्मा दान करू असा निश्चय त्याने वाढदिवशी जाहीर केला.

सचिन तेंडुलकरचा आज ४८ वा वाढदिवस. प्रदीर्घकाळानंतर तो सोशल मीडियावर आला आणि एका व्हिडीओद्वारे त्याने आपल्या तंदुरुस्तीची माहिती दिली. २७ मार्च रोजी त्याला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर घरात काही दिवस अलगीकरण, त्यानंतर रुग्णालयात उपचार आणि पुन्हा घरात विलगीकरण सचिनने केले. 

गतवर्षी मी एका प्लाझ्मा सेंटरचे उद्‍घाटन केले होते. कोरोनाबाधित रुग्णाला योग्य वेळी प्लाझ्मा मिळाला तर त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होत असते असे मला प्लाझ्मा सेंटरचे उद्‍घाटन करताना सांगितले होते. आता मी जेव्हा प्लाझ्मा दानासाठी पात्र ठरेन त्या वेळी मी ही जबाबदारी पार पाडणार आहे. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत त्यांनीही असेच करावे असे तो म्हणतो.


​ ​

संबंधित बातम्या