बाबरचा जबऱ्या वर्ल्ड रेकॉर्ड; जे विराटला जमलं नाही ते पठ्ठयानं करुन दाखवलं

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 3 April 2021

धावांचा पाठलाग करताना  कागिसो रबाडाने फखर झमान (8) याला बाद करत पाकिस्तानला अवघ्या 9 धावांवर पहिला धक्का दिला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांने जबरदस्त शतकी खेळी केली. या खेळीसह त्याने खास विक्रम आपल्या नावे केला. विराट कोहलीचा विक्रम मागे टाकून त्याने सर्वाधिक जलद 13 शतके झळकवण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. सेंच्युरियनच्या मैदानातील सेंच्युरीने बाबरच्या नावे जबऱ्या वर्ल्ड रेकॉर्ड झाला.  

यजमान दक्षिण अफ्रिका संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बाद 273 धावा केल्या होत्या. रेसी व्हॅ डर डुसेनने नाबाद 123 धावांची खेळी केली. यासाठी त्याने 134 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार खेचले. त्याच्याव्यतिरिक्त  डेविड मिलरने  50 धावांची उपयुक्त खेळी केली. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी आणि हॅरिस राउफ यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.  

धावांचा पाठलाग करताना  कागिसो रबाडाने फखर झमान (8) याला बाद करत पाकिस्तानला अवघ्या 9 धावांवर पहिला धक्का दिला. त्यानंतर बाबर आझमने कर्णधाराला साजेसा खेळ करत (103) धावांची खेळी केली. सलामीवीर इमाम उल हक (70) धावा करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.  बाबरने आपल्या शतकी खेळीत 17 चौकार खेचले. 

IPL 2021 : दिल्ली वर्सेस चेन्नई सामन्यापूर्वी टेन्शन; वानखेडेवरील 8 कर्मचाऱ्यांना कोरोना

बाबर आझमने 13 व्या वनडे शतकासाठी 76 वेळा फलंदाजी केली. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने 80 पेक्षा कमी डावात असा पराक्रम केलेला नाही. दक्षिण अफ्रिकेच्या हाशिम अमला याने 83 डावात 13 शतके झळकावली होती. भारतीय संघाचा कर्णधार आणि क्रिकेटच्या मैदानातील रनमशिन विराट कोहली आणि क्विंटन डिक्वाक यांनी 86 डावात 13 वे शतक पूर्ण केले होते. वनडेच्या क्रमवारीत कोहली पाठोपाठ बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर असून विराटला तो तगडी फाईट देताना दिसत आहे. 


​ ​

संबंधित बातम्या