एकदिवसीय क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलियाला अजून मेहनत करण्याची गरज - रिकी पॉन्टिंग

टीम ई-सकाळ
Thursday, 10 September 2020

ऑस्ट्रेलियाचा संघ उद्यापासून इंग्लंड सोबत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ उद्यापासून इंग्लंड सोबत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ काही दिवसांपूर्वीच इंग्लंड मध्ये दाखल झाला आहे. मात्र या मालिकेत विश्वचषक गतविजेते इंग्लंड वर विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाला दमदार कामगिरी करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियाच्या टीम मॅनेजमेंटला संघातील तिसऱ्या क्रमांकावर टिकून खेळणारा फलंदाज शोधण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. याशिवाय 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघाला बरीच तयारी करावी लागणार असल्याचे मत रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले. 

लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनी 'राफेल' विषयी म्हणतो... 

 इंग्लंड सोबतचा ऑस्ट्रेलियाचा दौरा उद्या पासून सुरु होत आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघात तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची भूमिका खूप महत्वाची असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाला अशा खेळाडूची आवश्यकता आहे जो या ठिकाणी खूप वेळ खेळू शकेल. शिवाय तिसऱ्या क्रमांकावर मार्नस लॅबुशेने किंवा स्टीव्ह स्मिथ या दोघांपैकी कोणीही खेळू शकतात. मात्र त्यांची कामगिरी सामन्यात मोलाची ठरणार असल्याचे पॉन्टिंगने म्हटले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या संघाला एकदिवसीय प्रकारात दबदबा निर्माण करण्यासाठी अजून मेहनत करण्याची गरज असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. 

हिटमॅनने मारलेला सिक्स आदळला चालत्या बसवर ; एकदा पहाच 

याशिवाय, ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात अजूनही काही कमतरता असल्याचे रिकी पॉन्टिंगने म्हटले आहे. संघाकडे पाहिले तर ही एक चांगली टीम आहे मात्र, ही कमतरता पुढील काही दिवसांमध्ये भरून काढण्याची आवश्यकता असल्याचे पॉन्टिंगने नमूद केले. यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी -20 मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 2-1 असे पराभूत केले होते.                


​ ​

संबंधित बातम्या