राहुलवर होणार शस्त्रक्रिया

पीटीआय
Monday, 3 May 2021

पंजाब किंग्जचा कर्णधार के. एल. राहुल याला अॅपेंडिक्स झाला आहे. तीव्र पोटदुखीमुळे त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

नवी दिल्ली - पंजाब किंग्जचा कर्णधार के. एल. राहुल याला अॅपेंडिक्स झाला आहे. तीव्र पोटदुखीमुळे त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. 

राहुल गत स्पर्धेत ऑरेंज कॅपचा मानकरी होता. त्याने शनिवारी रात्री पोटात खूप दुखत असल्याची तक्रार केली. औषधे दिल्याचाही फायदा झाला नाही, त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथील चाचणीत त्याला अॅपेंडिक्स झाला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला.

राहुलला तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्यावर रविवारी रात्रीच शस्त्रक्रिया अपेक्षित आहे. तो १० दिवसांत संघात परतण्याची शक्यता आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर राहुल जैवसुरक्षित वातावरणातच असेल. त्यामुळे तो संघात लगेच परतू शकेल, असे भारतीय क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या