वर्णभेदाचा_खेळ : ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेत कठोर कायद्याची गरज; 'गंभीर' मत

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

भारतीय संघातील जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना सिडनी कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी वर्ण द्वेषावरुन टार्गेट करण्यात आले. भारतीय संघाने मैदानातील पंचाकडे यासंदर्भात तक्रारही केली होती.

Racism Common In Australia : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशात वर्णद्वेषाचा मुद्दा सर्व सामान्य आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी याठिकाणी कठोर कायद्याची गरज आहे, असे मत भारताचे माजी क्रिकेटर आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर यांनी व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी सभ्यतेची मर्यादा ओलांडून भारतीय खेळाडूंच्या विरोधात वर्णभेदी टिप्पणी केली होती.  

भारतीय संघातील जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना सिडनी कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी वर्ण द्वेषावरुन टार्गेट करण्यात आले. भारतीय संघाने मैदानातील पंचाकडे यासंदर्भात तक्रारही केली होती. या सर्व प्रकाराव गंभीर म्हणाले की, ‘सिडनीच्या मैदानात घडलेला प्रकार निंदणीय आहे. कोणत्याही खेळाच्या मैदानात असा प्रकार खपवून घेतला जाणारा नाही. फक्त क्रिकेटच नव्हे तर सर्व क्रीडा क्षेत्रात घडणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी विशेष कायदा करण्याची गरज आहे. ज्याला या गोष्टीचा सामना करावा लागतो त्यालाच अधिक झळ पोहचते, असा उल्लेखही गंभीर यांनी केला आहे. 

"खाया पिया कुछ नही...गिलास तोडा बाराह आना"; सेहवागचा स्मिथला टोमणा

सिडनीच्या मैदानात भारतीय खेळाडूंसोबत घडलेल्या प्रकारानंतर संबंधित प्रेक्षकांना पोलिसांनी स्टेडियममधून बाहेर काढले होते. ऑस्ट्रेलियन कर्णधार पेन टीम याच्यासह अनेक दिग्गजांनी भारतीय संघातील खेळाडूंना पाठिंबा देत वर्णद्वेषाला थारा मिळणार नसल्याचे संकेत दिले होते. वर्णद्वेषाचा मुद्दा क्रीडा क्षेत्रात नवा नाही. यापूर्वी अनेक घडना घडल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तर याप्रकरणामुळे 12 वर्ष वनवास भोगला होता. तरीही हा प्रकार आणि लोकांची मानसिकता बदलताना दिसत नाही. 


​ ​

संबंधित बातम्या