पुण्याचा वुमेन्स क्रिक झोन कंपनीचा क्रिकेट प्रक्षेपणाबाबत मोठा करार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 June 2021

आफ्रिकेतील क्रिकेट म्हटल्यावर डोळ्यांसमोर मुख्यत्वे दक्षिण आफ्रिका आणि झिंम्बाब्वेचे संघ येतात. पण आता पूर्व आफ्रिकेतही महिलांच्या क्रिकेटचा भरपूर प्रसार झाला आहे. रवांडा देशाची क्रिकेट संघटना क्वीबुका नावाने सहा देशांची महिलांची टी 20 क्रिकेट स्पर्धा ६ ते १२ जून दरम्यान आयोजित करत आहे.

पुणे - आफ्रिकेतील क्रिकेट म्हटल्यावर डोळ्यांसमोर मुख्यत्वे दक्षिण आफ्रिका आणि झिंम्बाब्वेचे संघ येतात. पण आता पूर्व आफ्रिकेतही महिलांच्या क्रिकेटचा भरपूर प्रसार झाला आहे. रवांडा देशाची क्रिकेट संघटना क्वीबुका नावाने सहा देशांची महिलांची टी 20 क्रिकेट स्पर्धा ६ ते १२ जून दरम्यान आयोजित करत आहे. त्याचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियाच्या माध्यमातून करायचा करार निश्चित झाला आहे.  

वुमेन्स क्रिक झोन या पुण्यातील स्टार्टअप कंपनी आफ्रिकेतील रुवांडा क्रिकेट असोसिएशनबरोबर पाच वर्षांचा करार केला आहे, ज्यात या कंपनीला रवांडा संघ खेळत असलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण यू-ट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून करता येणार आहे. क्वीबुका स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण वुमेन्स क्रिक झोन करणार आहे.

मूळच्या मालेगावच्या यश लाहोटी या तरुणाने महिलांच्या क्रिकेटला योग्य प्रसिद्धी मिळावी म्हणून वुमेन्स क्रिक झोनची स्थापना केली. ज्यात पुण्यातील नामांकितांनी भांडवली गुंतवणूक केली आहे.


​ ​

संबंधित बातम्या