भारतीय महिला संघाची ट्‌वेंटी-20 क्रमवारीत प्रगती 

संजय घारपुरे
Saturday, 3 October 2020

विश्‍वकरंडक टवेंटी- 20 उपविजेत्या भारतीय महिला संघाने जागतिक ट्‌वेंटी 20 क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले.

मुंबई : विश्‍वकरंडक टवेंटी- 20 उपविजेत्या भारतीय महिला संघाने जागतिक ट्‌वेंटी 20 क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले, तर एकदिवसीय क्रमवारीत भारतीय महिला संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र यात आघाडीवरील ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तफावत खूपच वाढली आहे. 

IPL 2020 : अब्दुलमुळं जम्मू-काश्मीरात आयपीएलची चर्चा!

ट्‌वेंटी 20 क्रमवारीत भारताने न्यूझीलंडला मागे टाकत तिसरे स्थान मिळवले. आघाडीच्या पंधरा संघांतील हा एकमेव बदल आहे. भारताचे आता 270 मानांकन गुण आहेत, तर न्यूझीलंडचे 269. ऑस्ट्रेलिया (291) आणि इंग्लंड (280) हे पहिल्या दोन स्थानी आहेत. पाकिस्तान 230 गुणांसह सातवे आहेत. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रमवारीतील स्थान भक्कम करताना भारतास 39 गुणांनी मागे टाकले आहे. जागतिक क्रिकेट क्रमवारीतील ही सर्वात मोठी आघाडी आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेस 3-0 असे हरवल्याचा ऑस्ट्रेलियास फायदा झाला. 

IPL2020 : मागील पायावर भार द्या आणि षटकार खेचा - डॅरेन सॅमी

ऑस्ट्रेलियाचे 160, तर भारताचे 121 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचे मानांकन गुण आठनी वाढले, तर भारताचे चारने कमी झाले. दुसऱ्या क्रमांकावरील भारताने इंग्लंडला (119) दोन गुणांनी मागे टाकले आहे. पाकिस्तान 77 गुणांसह सातवे आहेत. 

अव्वल दहा संघ  
एकदिवसीय : 1) ऑस्ट्रेलिया (160), 2) भारत (121), 3) इंग्लंड (119), 4) दक्षिण आफ्रिका (107), 5) न्यूझीलंड (94), 6) वेस्ट इंडिज (85), 7) पाकिस्तान (77), 8) बांगलादेश (61), 9) श्रीलंका (47), 10) आयर्लंड (13). 

ट्‌वेंटी 20 : 1) ऑस्ट्रेलिया (291), 2) इंग्लंड (280), 3) भारत (270), 4) न्यूझीलंड (269), 5) दक्षिण आफ्रिका (249), 6) वेस्ट इंडीज (236), 7) पाकिस्तान (230), 8) श्रीलंका (202), 9) बांगलादेश (192), 10) आयर्लंड (168).


​ ​

संबंधित बातम्या