आईच्या निधनाचे दुःख पचवून प्रिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 May 2021

भारतीय महिला क्रिकेटपटू प्रिया पुनिया हिची आई सरोज यांचे कोरोनामुळे सोमवारी निधन झाले, पण हे दुःख मागे ठेवून प्रिया आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज होत आहे.

जयपूर - भारतीय महिला क्रिकेटपटू प्रिया पुनिया हिची आई सरोज यांचे कोरोनामुळे सोमवारी निधन झाले, पण हे दुःख मागे ठेवून प्रिया आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज होत आहे. 

इंग्लंड दौऱ्यात होणाऱ्या एकमेव कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी प्रियाची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. आईच्या निधनाचे दुःख पचवून प्रिया बुधवारी मुंबईत दाखल झाली. सर्व खेळाडूंचे आजपासून १४ दिवसांचे विलगीकरण सुरू झाले. २ जून रोजी भारतीय संघ लंडनला रवाना होणार आहे.

देशाकडून खेळत राहावे हे माझ्या आईचे स्वप्न होते. इंग्लंड दौऱ्यासाठी माझी निवड झाली हे ऐकून ती आनंदी झाली होती. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी हा आव्हात्माक काळ आहे, पण काहीही झाले तरी खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला आई मला वारंवार देत होती असे प्रियाने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या