टी-२० मालिकेत हरमनप्रीतवर दडपण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 July 2021

भारत आणि इंग्लंड महिलांमध्ये उद्यापासून ट्वेन्टी-२० लढतींची मालिका सुरू होत आहे, परंतु भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरवरच अधिक दडपण असणार आहे.

नॉदर्म्टन - भारत आणि इंग्लंड महिलांमध्ये उद्यापासून ट्वेन्टी-२० लढतींची मालिका सुरू होत आहे, परंतु भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरवरच अधिक दडपण असणार आहे.

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला आहे, परंतु अनुभवी हरनप्रीत कौर अपयशी ठरलेली आहे. कसोटी आणि वनडेत कर्णधार असलेली मिताली राज ट्वेन्टी-२० खेळत नसल्याने आता सर्व जबाबदारी हरमनप्रीतवर आहे. शेफाली, स्मृती मंधाना आणि स्नेह राणा यांच्यावर भारतीय संघाची भिस्त असेल, पण ही मालिका जिंकायची असेल तर हरनप्रीतला योगदान द्यावेच लागणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या