द्रविड झाला 'इंदिरानगरचा गुंडा'; मुंबई-नागपूर पोलिसांचं ट्विट व्हायरल

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 April 2021

राहुल द्रविडच्या संयमाचे आपल्याकडे दाखले दिले जातात. क्रिकेटच्या मैदानात असो किंवा मैदानाबाहेर तो रागात कधीच दिसलेला नाही

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या संयमाचे आपल्याकडे दाखले दिले जातात. क्रिकेटच्या मैदानात असो किंवा मैदानाबाहेर तो रागात कधीच दिसलेला नाही. पण राहुल द्रविडच्या रागाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यात राहुल द्रविड रागाच्या भरात बॅटने गाडीच्या काचा फोडताना पाहायला मिळतो. तसेच कारमधून बाहेर येत स्वत:ला इंदिरानगरचा गुंड असल्याचे सांगताना दिसते. राहुल द्रविडचं असं रुप याधी कधीच पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा सुरु आहे. 

राहुल द्रविडनं यात उच्चारलेला इंदिरानगरचा गुंड हा शब्द सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. राहुल द्रविडचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर #IndiraNagarkaGunda आणि #Indiranagar ka gunda hun main हे ट्रेंड सुरू झाले आहेत.  अनेकांनी यावर मिम्स तयार केले आहेत. तर काहींनी सामाजिक संदेश देण्यासाठी वापर केला. मुंबई पोलिसांनी त्याच्या या जाहिरातीवरून कोरोना विषाणूबाबत जनजागृती करणारं ट्विट केलं आहे. ''कोरोना विषाणू तुमच्याकडे येतोय, हे मास्क पाहतोय,''असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे. (हेही वाचा ; द्रविडने बॅटने फोडल्या गाडीच्या काचा; विराटने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल )

मुंबई पोलिसांशिवाय सुरत आणि नागपूर पोलिसांनीही राहुल द्रविडच्या जाहीरातीवरुन मिम्स शेअर करत सामाजिक संदेश दिला आहे. (हेही वाचा : द्रविडनंतर व्यंकटेश प्रसाद झाला इंदिरा नगरच्या गुंडा; पाकिस्तानी पत्रकाराला दाखवली जागा)

नेटकऱ्यांनाही राहुल द्रविडच्या जाहीरातीवरुन अनेक मिम्स शेअर केले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या