पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव; अफ्रीकाने १४ व्या षटकात मिळवला विजय

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 April 2021

PAK vs SA :  प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तान संघाला १४ व्या षटकांत लोळवलं.

Pakistan vs South Africa : दक्षिण अफ्रीकाने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तान संघाचा ६ षटकं आणि सहा गडी राखून लाजीरवाणा पराभव केला आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थिती तक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानच्या अनुभवी संघाला लोळवलं. डिकॉक, मिलर, नॉर्त्जे आणि रबाडा असे प्रमुख खेळाडू सध्या भारतात आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत आफ्रिका संघानं पाकिस्तान संघाचा मानहानीकारक पराभव केला.  

दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत दक्षिण आफ्रिका संघानं चार सामन्याची मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. जोहानेसबर्ग येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघानं प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात १४० धावा केल्या. बाबर आजम (५०)  आणि मोहम्मद हाफीज (३२) यांचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. उर्वरित फलंदाजांना २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. दक्षिण अफ्रीका संघाकडून जॉर्ज लिंडे आणि लिजाड विलियम्स यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. 

पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघानं दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सहज पराभव केला. १४१ धावांचं लक्ष आफ्रिकानं १४ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. सलामी फलंदाज एडेन मार्करम (Aiden Markram) ने ३० चेंडूत ५४ धावांची अर्धशतकी खेली केली. तर कर्णधार हेनरिक क्लासेन यानं २१ चेंडूत ३६ धावा चोपल्या.  पाकिस्तानकडून उस्मान कादिर यानं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.


​ ​

संबंधित बातम्या