ENGvsPAK 2nd T20I: चांगला खेळ करुनही पाक अपयशीच; इंग्लंडचा दिमाखदार विजय

सुशांत जाधव
Sunday, 30 August 2020

इंग्लंडने 5 चेंडू आणि 5 गडी राखून सामना सहज खिशात घातला.

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानातील दुसऱ्या टी-20 सामन्यातील दिमाखदार विजयाने यजमान इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने दिलेल्या 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडने 5 चेंडू आणि 5 गडी राखून सामना सहज खिशात घातला. टॉम बेंटोन आणि जॉनी बेयरस्टो या जोडीने इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर 66 धावा असताना धमाकेदार फलंदाजी करणारा जॉनी बेयरस्टोला शदाब खानने तंबूचा रस्ता दाखवला. जॉनीने 24 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 44 धावा कुटल्या. त्यानंतर मैदानत उतरलेल्या डेव्हिड मलन 36 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनने 33 चेंडूत 66 धावांची खेळी केली. मोईन अली 1 तर सॅम बिलिंग्सन 10 धावांचे योगदान केले. लेविस शून्यावर नाबाद परतला. 

जबर अर्धशतकी खेळीनं पाक कर्णधार बाबरची कोहली-फिंचच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

  पाकिस्तानकडून शदाब खानने 4 षटकांच्या कोट्यात 34 धावा खर्च करुन सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. हरिस रॉफने दोन गडी बाद करत त्याला साथ दिली. पण प्रमुख गोलंदाज अपयशी ठरल्यामुळे मोठी धावसंख्या उभारुनही पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की ओढावली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या होत्या. यात सलामीवीर आणि कर्णधार बाबर आझम (56), फखर झमान (36), हाफीज (69) तर शोएब मलिक 14 धावा करुन बाद झाले. इफ्तिहार अहमद 8 आणि शदाब खान 0 नाबाद राहिले. इंग्लंडकडून फिरकीपटू अदिल राशिदने सर्वाधिक दोन तर टॉम कुरेन आणि क्रिस जार्डन यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.


​ ​

संबंधित बातम्या