बॉल कुठं आणि पळतोय कुठं बघा ; पाकच्या गड्याची फजिती (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 13 April 2021

शरजील याल 4 वर्षानंतर पाकिस्तान संघात स्थान देण्यात आले होते. कॅच जज करताना त्याची उडालेली तारांबळही हास्यास्पदच होती.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेलल्या पाकिस्तानला दुसऱ्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पाकिस्तान संघाच्या फिल्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.  दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात  शरजील खान (Sharjeel Khan) याने एक सोपा झेल सोडल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याला चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.  शरजील याल 4 वर्षानंतर पाकिस्तान संघात स्थान देण्यात आले होते. कॅच जज करताना त्याची उडालेली तारांबळही हास्यास्पदच होती.

EPIC LOL pic.twitter.com/Q8DhsUeyh2

— Taimoor Zaman (@taimoorze) April 12, 2021

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 13 व्या षटकात शरजीलने सहज घ्यायला पाहिजे असा कॅच सोडला. उस्मान कादिरच्या गोलंदाजीवर जॉर्ज लिंडे याने  खेळलेल्या शॉटनंतर चेंडू उंच हवेत उडाला. लॉगऑनच्या दिशेने हवेत उडालेला चेंडू शरजीला जज करता आला नाही. तो कॅच पकडण्यासाठी धडपडला पण बॉल मागे आणि तो पुढे असे चित्र पाहायला मिळाले. लॉन्ग ऑफच्या दिशेने दुसऱ्या फिल्डरने त्याला कव्हर करत बॉल पकडला. 

पदार्पणाच्या सामन्यात चेतन सकारियाने घेतला अफलातून झेल, निकोलस पुरनला शून्यावर पाठवलं माघारी

कर्णधार बाबर आझमचे अर्धशतक 50 (50) आणि हाफिज 32 (23) धावांच्या जोरावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 140 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून जॉर्ज लिंडे आणि विल्यम्सने प्रत्येकी 3-3 तर शम्सी आणि मंगला यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 

(हेही वाचा ; यूनिवर्स बॉसचा षटकारांचा विक्रम; रोहित-धोनी आसपासही नाहीत)

या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 44 धावांवर मलानच्या रुपात पहिली विकेट गमावली. विहान लुबे12 धावा करुन परतल्यानंतर मार्करमने अर्धशतकी खेळी करुन संघाचा डाव सावरला. त्याने 30 चेंडूत 54 धावांची खेळी केली. कर्णधार हेन्रीच क्लासेन 21 चेंडूत नाबाद 36 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेने 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 व्या षटकातच 141 धावांचे आव्हान पार केले. या सामन्यातील विजयासह आफ्रिकेने चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 बरोबरी साधली.


​ ​

संबंधित बातम्या