विश्वकरंडक ट्वेन्टी-२० अमिरातीत आज केली अधिकृत घोषणा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 June 2021

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा अमिरातीत होणार आहे हे जवळपास निश्चित आहे, अशी माहिती बीसीसीआय सचिव जय शहा यांनी शनिवारी दिली होती. त्यानंतर सोमवारी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या घटनेवर शिक्कामोर्तब केले  होते.

मुंबई - ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा अमिरातीत होणार आहे हे जवळपास निश्चित आहे, अशी माहिती बीसीसीआय सचिव जय शहा यांनी शनिवारी दिली होती. त्यानंतर सोमवारी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या घटनेवर शिक्कामोर्तब केले  होते. सर्व गुपित उघड झाल्यावर मंगळवारी आयसीसीने अधिकृत ईमेलद्वारे ही स्पर्धा अमिरातीत होत असल्याचे जाहीर केले.

स्थगित झालेल्या आयपीएलचा पुढचा टप्पा अमिरातीत होत असल्याने पाठोपाठ होणारी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा भारतात न होता तीसुद्धा अमिरातीत होणार ही केवळ औपचारिकता होती, पण भारतीय पदाधिकाऱ्यांनी याची प्रसिद्ध माध्यमांद्वारे (अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे नाही) जाहीर केल्यानंतर आयसीसीने आज त्याची औपचारिकता पार पाडली.

जय शहा आणि गांगुली यांनी स्पर्धेच्या नेमक्या तारखा जाहीर केल्या नव्हत्या, परंतु आयसीसीने १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर हा स्पर्धेचा कालावधी जाहीर केला. एरवी दोन वर्षांनी ट्वेन्टी-२० स्पर्धा व्हायची, परंतु ही स्पर्धा पाचव्या वर्षी होत आहे. 

यावेळी आठ संघांची पात्रता स्पर्धा होणार आहे ती ओमानमध्ये होईल. बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँडस, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान आणि पापू न्यू गयाना या आठ संघांतून चार संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील.


​ ​

संबंधित बातम्या