भावा नेटानं खेळलास पण 4 दिवस लेट झालास; अश्विनच्या 'त्या' ट्विटचा अर्थ काय?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 22 February 2021

अश्विनच ट्विट काहींना समजले असेल. पण काहींना नेमक अश्विनला काय म्हणायच आहे ते कळलंही नसेल. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडच्या ड्वेन कॉन्वेनं धमाकेदार खेळी केली. त्याने अवघ्या 59 चेंडूत 167 च्या स्टाईक रेटने 10 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने  99 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर अश्विने केलेले ट्विट सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. खेळी अफलातूनच पण चार दिवस उशीर झाला, या आशयाचे ट्विट अश्विनने केले आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते. अश्विनच ट्विट काहींना समजले असेल. पण काहींना नेमक अश्विनला काय म्हणायच आहे ते कळलंही नसेल. 

IND vs ENG : पिंक बॉलवर खेळण्यासाठी उमेश यादव फिट; BCCI ने शार्दुलला केलं रिलीज

अश्विनने जे ट्विट केलय ते आयपीएलच्या मिनी लिलावाच्या पार्श्वभूमीवर आहे. 29 वर्षीय क्रिकेटर इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) मिनी लिलाव प्रक्रियेत सहभागी होता. मात्र तो अनसोल्ड राहिला होता. त्याची बेस प्राईजही 50 लाख इतकी होती. चार दिवसांपूर्वी ही खेळी पाहायला मिळाली असती तर आयपीएलमध्ये तो मालामाल झाला असता, असे सूचक ट्विट अश्विनने केले आहे. कोन्वेचं शतक अवघ्या एका धावनं हुकल असलं तरी न्युझीलंडकडून सलग 5 अर्धशतक झळकवणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

भारताकडून विरेंद्र सेहवागने 2012 मध्ये असा पराक्रम केला होता.  
 

टी-20 मध्ये सलग पाच अर्धशतके झळकवणारे फलंदाज
2012  विरेंद्र सहवाग
2012  हॅमिल्टन मसाकाद्ज़ा
2017  कामरान अकमल
2018  जोस बटलर
2019  डेविड वार्नर 

पहल्या 5 T20Is सामन्यात सर्वाधिक अर्धशतके 

4: डेविड मलान
3: ड्वेन कोन्वे
3: ग्रीम स्मिथ
3: सनथ जयसूर्या 
 


​ ​

संबंधित बातम्या