भारताविरुद्धच्या लढतीसाठी किवींची विजयी पूर्वतयारी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 June 2021

न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत आठ विकेटनी बाजी मारली. यासह किवींनी भारताविरुद्धच्या कसोटी जगज्जेतेपद लढतीची जोरदार पूर्वतयारी केली.

बर्मिंगहॅम - न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत आठ विकेटनी बाजी मारली. यासह किवींनी भारताविरुद्धच्या कसोटी जगज्जेतेपद लढतीची जोरदार पूर्वतयारी केली. आघाडीचे खेळाडू नसतानाही न्यूझीलंडने एक दिवस शिल्लक ठेवून बाजी मारली.

केन विलियमसनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडने हे यश मिळवले. किवींनी या शतकात प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी जिंकली, त्यांनी इंग्लंडमधील १८ कसोटी मालिकेत दोनदाच बाजी मारली होती.


​ ​

संबंधित बातम्या