भारताविरोधात होणाऱ्या WTC फायनलसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 8 April 2021

केन विल्यमसनच्या नेतृत्वातील २० सदस्याच्या संघाची घोषणा

आगामी इंग्लंड आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट मंडळानं केन विल्यमसनच्या नेतृत्वातील २० सदस्याच्या संघाची घोषणा केली आहे. संघात  रचिन रवींद्र, जॅकब डफी आणि डेवोन कॉन्वे यासारख्या नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यासोबतच भारतात होणाऱ्या विश्वचषकाला समोर ठेवून  वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनलाही संधी देण्यात आली आहे.  

न्यूझीलंडचा संघ या दौऱ्यात इंग्लंडविरोधात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यापूर्वी होणार आहे. ही मालिका कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग नसेल. २ जूनपासून लंडनमधील प्रसिद्ध अशा लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पहिला सामन्याची कसोटी सामना होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना १० जून रोजी बर्मिंघम येथे होणार आहे.  या मालिकेपूर्वी न्यूझीलंडचा संघ टॉन्टनसंघासोबत चार दिवसाचा सराव सामना खेळणार आहे. 

न्यूजीलंडचा संघ -
 केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जॅकब डफी, मॅट हेन्री, कायल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोल्स, अॅजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टीरक्षक), विल यंग


​ ​

संबंधित बातम्या