विराटसह मुंबईतील खेळाडूंचे ‘वर्क फ्रॉम होम’

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 May 2021

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय खेळाडूंचे विलगीकरण कधीच सुरू झाले आहे. मुख्य मार्गदर्शक रवी शास्त्री यांच्यासह मुंबईत राहणाऱ्या खेळाडूंचा अपवाद होता; मात्र सोमवारपासून त्यांचाही जैवसुरक्षा वातावरणात समावेश झाला.

हॉटेलच्या रूममध्येच वर्क आउट, इंग्लंड दौऱ्यासाठी सात दिवसांचे विलगीकरण सुरू
मुंबई - इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय खेळाडूंचे विलगीकरण कधीच सुरू झाले आहे. मुख्य मार्गदर्शक रवी शास्त्री यांच्यासह मुंबईत राहणाऱ्या खेळाडूंचा अपवाद होता; मात्र सोमवारपासून त्यांचाही जैवसुरक्षा वातावरणात समावेश झाला. दौऱ्यावर निघण्यापूर्वी तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी विराट आणि कंपनीला हॉटेलच्या रूममध्येच वर्कआऊट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर हे मुंबईत राहणारे खेळाडू आहेत. गेल्या सोमवारपासून मुंबईबाहेरील खेळाडूंसाठी १४ दिवसांचे विलगीकरण सुरू झाले होते; मात्र मुंबईतील या खेळाडूंना जर आठवड्यानंतर विलगीकरण सुरू करायचे असेल तर त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. (मुंबईसाठी विमान प्रवास करणार नसल्यामुळे हा अपवाद होता).

विराटसह रवी शास्त्री यांचेही विलगीकरण सुरू झाले, परंतु ते पुढील सात दिवस अगोदरपासून विलगीकरणात असलेल्या खेळाडूंना प्रत्यक्ष भेटू शकणार नाहीत. आता हे सर्व जण २ जून रोजी एकत्र येऊन लंडनला प्रयाण करतील.

विलगीकरणाच्या एकांताचा खेळाडूंना कोणताही त्रास होणार नाही यासाठी बीसीसीआयने तयारी केली आहे. खेळाडूंसाठी हॉटेलच्या रूममध्येच वर्क आऊट करण्याची साधने ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व खेळाडू आपल्या नित्याचा व्यायाम करू शकतील. यामध्ये वर्कआऊट सायकल, डंबेल्स, लोखंडी बार आणि प्लेट्स या साहित्यांचा त्यात समावेश आहे.


​ ​

संबंधित बातम्या