"Definitely धोनी टी-20 वर्ल्ड कपसाठी फिट होता"

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 22 February 2021

महेंद्रसिंह धोनी टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती जाहीर करेल, अशी चर्चा रंगली होती. 

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीसंदर्भात बीसीसीआय निवड समितीच्या माजी सदस्याने मोठे वक्तव्य केले आहे. धोनी टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी फिट होता, असे सरनदीप सिंह यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. युएईत होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी चेन्नईच्या ताफ्यातून भारतातून दुबईला कूच करण्यापूर्वी महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. 15 ऑगस्टच्या दिवशी धोनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीचा मोठा निर्णय जगजाहिर केला होता. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती जाहीर करेल, अशी चर्चा रंगली होती. 

बॅटिंग-बॉलिंगनंतर डान्सिंग मूड, अश्विनसोबत पांड्या-कुलदीपनेही धरला ठेका (VIDEO)

या मुद्याभवर भाष्य करताना बीसीसीआय निवड समीतीचे माजी सदस्य सरनदीप सिंह म्हणाले की, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कप रद्द झाला नसता तर तो धोनीला आपण टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना पाहिले असते. कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात रंगणारी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. ही स्पर्धा आता भारतामध्ये स्थलांतरित झाली आहे. 

वंदे मातरम गीत ऐकत इंग्लंड खेळाडूंची प्रॅक्टिस; स्टोक्सनं शेअर केला व्हिडिओ

ते पुढे म्हणाले की, आम्हाला सर्वांना धोनीने टी-20 वर्ल्ड स्पर्धेत खेळावे असे वाटत होते. त्याला बाहेर बसवण्याचे कोणतेही कारण नव्हते. तो शंभर टक्के फिट होता. त्याने सरावातून कधीच ब्रेक घेतला नाही. दुखापतीमुळे तो सामन्याला मुकला असे कधीच झाले नाही, अशा शब्दांत सरनदीप यांनी धोनीच्या फिटनेसचे कौतुक केले. धोनीने भारतीय संघाला सर्व प्रकारातील ट्रॉफ्या जिंकून दिल्या आहेत. त्याने टी-20 वर्ल्ड कप खेळून निवृत्त व्हायला हवे होते, असे माझे वैयक्तीक मत आहे.  माझ्या मताप्रमाणेच बीसीसीआय निवड समितीच्या अन्य सदस्यांचीही हीच भावना होती, असेही ते म्हणाले. 


​ ​

संबंधित बातम्या