Vijay Hazare Trophy 2021 : महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराजची शतकी चमक

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 22 February 2021

केदार जाधवला नावाला साजेसा खेळ करता आला नाही.

जयपूर : ऋतुराज गायकवाडचे आक्रमक शतक आणि राजवर्धन हंगर्गेकरच्या प्रभावी गोलंदाजीमुळे महाराष्ट्राने विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत हिमाचल प्रदेशला 59 धावांनी सहज हरवले. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या संघाने धावफलकावर 8 बाद 295 धावा लावल्या होत्या. ऋतुराज गायकवाडने 109 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 102 धावा केल्या. यश नहार 63 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार खेचत संघाच्या धावसंख्येत 52 धावांची भर घातली.नौशाद शेखने 25 चेंडूत 28 धावा केल्या. 

केदार जाधवला नावाला साजेसा खेळ करता आला नाही, त्याने अवघ्या 14 धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवा. अंकित बावणे  37 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने  52 धावांची धमाकेदार खेळी केली. अझिम काझीनेही 36 चेंडूत 47 धावा कुटल्या.  यात त्याने 2 चौकार आणि 2 षटकार खेचले. 

IND vs ENG : टी-20 मालिकेसाठी सूर्यासह IPL मधील तीन हिरोंची टीम इंडियात वर्णी

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला हिमाचल प्रदेशचा संघा 48.3 षटकात 236 धावांपर्यंतच मजल मारु शकला. हिमाचल प्रदेशच्या संघाकडून अभिमन्यू राणा 46 (71), अमित कुमकार 34 ऋषी धवन 22 आणि अंकुश बैन्स 28 धावा केल्या. महाराष्ट्राकडून  ऋषी धवनने 57 धावा खर्च करुन 2 विकेट घेतल्या. आयुष जमावल याला दोन विकेट घेण्यात यश आले. वैभव अरोराने 45 धावा खर्च करुन सर्वाधिक 4 गडी टिपले.  


​ ​

संबंधित बातम्या