''पंत पेक्षा संजू सर्वोत्तम पर्याय'' 

टीम ई-सकाळ
Sunday, 11 October 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. धोनीने मागील वर्षी झालेल्या एकदिवसीय वर्ल्डकप दरम्यान न्यूझीलँड विरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर यावर्षी 15 ऑगस्टला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात के एल राहुल सध्या वनडे आणि टी -20 मध्ये यष्टीरक्षकाची भूमिका निभावत आहे. मात्र टीम इंडियात यष्टीरक्षकाच्या रेसमध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन देखील आहेत. तर व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये के एल राहुल हा ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोघांपेक्षा पुढे आहे. व न्यूझीलँड दौर्‍यावर राहुलने आपली उपयुक्तताही सिद्ध केली. याव्यतिरिक्त यंदाच्या आयपीएल मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करत असलेल्या के एल राहुलने आत्तापर्यंत धमाकेदार कामगिरी करत सर्वाधिक धावा केलेल्या आहेत. 

के एल राहुलच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघात आहे. मात्र संघाला अजून एका  यष्टीरक्षकाची गरज असून, त्यासाठी ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोघेही स्पर्धेत आहेत. आणि आयपीएल मधील कामगिरीमुळे संजू सॅमसनच्या चाहत्यांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही क्रिकेट समीक्षक संजू सॅमसनला तर काहीजण ऋषभ पंतला सपोर्ट करत आहेत. त्यानंतर आता इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. केविन पीटरसनने संजू सॅमसनची पाठराखण करताना, यंदाच्या आयपीएल मधील संजू सॅमसनची तंदरुस्ती आणि फलंदाजीचे कौतुक केले आहे. 

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात कोहलीने केला नवा विक्रम ; गंभीर, रैनाला टाकले मागे  

केविन पीटरसनने संजू सॅमसनच्या खेळीबद्दल बोलताना यावर्षीच्या आयपीएल मध्ये त्याने चांगली कामगिरी केली असल्याचे म्हटले आहे. तसेच सॅमसनच्या कामगिरीमुळे त्याची खेळाविषयीची आपुलकी आणि बांधिलकीने आपण खूप प्रभावित झाल्याचे पीटरसनने म्हटले आहे. शिवाय ऋषभ पंत आणि सॅमसन यांच्या फलंदाजीचा स्ट्राईक रेट पाहिल्यास तो काहीसा वरचढ ठरत असल्याचे पीटरसनने सांगितले. आणि याच कारणामुळे सॅमसन हा भारताचा पुढील विकेटकीपर-फलंदाज म्हणून आपण पाहत असल्याचे केविन पीटरसनने म्हटले आहे.  

दरम्यान, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांनी आत्तापर्यंत आयपीएल मध्ये प्रत्येकी सहा सामने खेळले आहेत. ज्यामध्ये संजू सॅमसनने 160 च्या स्ट्राइक रेटने 176 धावा केलेल्या आहेत. तर ऋषभ पंतने देखील 176 धावा केलेल्या आहेत. मात्र त्याचा स्ट्राइक रेट हा 133 च्या जवळपास आहे.                


​ ​

संबंधित बातम्या